Mango Buying Trick: या सोप्या पद्धतीने जाणून घ्या आंबा गोड आहे का आंबट

लाइफफंडा
Updated May 13, 2022 | 11:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mango Buying Trick । फळांचा राजा आंबा चवीला गोड तर कधी आंबट असतो. कच्च्या आंब्यातील आंबटपणा सर्वांनाच आवडत असला तरी पिकलेले आंबे (Ripe Mangoes) चवीला जरा जरी आंबट लागले तरी आपण खाणे टाळतो.

Find out in this simple way why mango is sweet and sour
या सोप्या पद्धतीने जाणून घ्या आंबा गोड आहे का आंबट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या गरमीचे दिवस चालू आहेत.
  • या दिवसांत फळांचा राजा आंबा आपल्या चवीने सर्वांना आकर्षित करत असतो.
  • काही सोप्या पद्धतीने आंबा गोड आहे की आंबट हे तपासले जाऊ शकते.

Mango Buying Trick । मुंबई : फळांचा राजा आंबा चवीला गोड तर कधी आंबट असतो. कच्च्या आंब्यातील आंबटपणा सर्वांनाच आवडत असला तरी पिकलेले आंबे (Ripe Mangoes) चवीला जरा जरी आंबट लागले तरी आपण खाणे टाळतो. त्यामुळे आंबा खरेदी करताना हे देखील पाहणे आवश्यक आहे की आंबा गोड (Sweet Mangoes) आहे की आंबट. नुसते पाहून आणि स्पर्श करून आंबा आंबट आहे की गोड हे सांगता येईल का? याबाबत सर्वांच्या मनात संभ्रम असतो त्यामुळे याचे उत्तर होय असे आहे. काही सोपी पद्धत आहे ज्याच्या माध्यमातून आंबा गोड आहे की आंबट हे पाहिले जाऊ शकते. (Find out in this simple way why mango is sweet and sour). 

वेबस्टोरी : भारतीय आंब्याचे १० प्रकार

अधिक वाचा : या ३ तारखांना जन्मलेली मुले असतात खूप हुशार

चांगले आंबे निवडण्याची पद्धत (Tricks To Choose Good Mangoes)

* आंब्याला स्पर्श करा. पिकलेले गोड आंबे स्पर्शाला थोडे मऊ असतात, परंतु इतके मऊ नसतात की आपण आपल्या बोटाला स्पर्श करता आपले बोट आंब्यात शिरते. 

* आंब्याचा वास घ्या आणि त्यात कोणत्याही प्रकारचे केमिकल, अल्कोहोल किंवा औषधाचा वास येत नाही हे पाहा कारण असे आंबे केमिकलच्या साहाय्याने पिकवले जातात आणि वाढवले ​​जातात. ते नैसर्गिक नसतात. 

* आंब्याच्या देठाजवळ त्यांचा वास घ्या. जर तुम्हाला अननस किंवा खरबूजाचा वास येत असेल तर ते पिकलेले आणि गोड असतील. 

* हलके आणि दबत असलेले आंबे खरेदी करू नका. एकाच ठिकाणी जास्त वेळ ठेवलेले आंबे सडलेले असतात. 

* फुटबॉलसारखे दिसणारे आंबे अनेकदा गोड असतात. फार पातळ आणि तडतडलेले चपटे आंबे घेऊ नका.

* रेषा किंवा सुरकुत्या असलेले आंबे घेऊ नका, कारण ते कुजत चाललेले असतात. 

* तसेत तुम्हाला ज्या विविध प्रकारच्या आंब्याची माहिती आहे असेच आंबे खरेदी करा. उदाहरणार्थ, अटाउल्फो (Ataulfo Mangoes) आंबे पूर्णपणे पिकण्यापूर्वी सुरकुत्या आणि मऊ असतात.

* फ्रान्सिस आंबा पिकल्यावर हलका हिरवा दिसतो आणि तो S अक्षराच्या आकारात दिसतो. पूर्ण वाढ झाल्यावर त्यांचा पिवळसर सोनेरी रंग येतो.

* हेडन हा आंब्याचा एक प्रकार आहे ज्यामध्ये पिवळ्या रंगावर लहान पांढरे ठिपके दिसतात. ते किंचित अंडाकृती आणि गोलाकार आहेत आणि असे आंबे प्रामुख्याने एप्रिल आणि मे महिन्यात आढळतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी