Nude Lipstick Shades: 'न्यूड' लिपस्टिकमागची खरी मेख काय आहे जाणून घ्या, वाचा ही बातमी

लाइफफंडा
Updated May 10, 2022 | 11:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Perfect Nude Lipstick Shade: 'न्यूड' लिपस्टिक सध्या ट्रेंडमध्ये आहे. तरुणी असो की महिला, आजकाल प्रत्येकजण 'न्यूड' लिपस्टिक निवडतो, पण याला 'न्यूड' लिपस्टिक का म्हणतात असा प्रश्न नेहमी मनात येतो.

Find out  the reality behind 'Nude' lipstick, read this news
'न्यूड' लिपस्टिकमागचं खरं सत्य काय?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'न्यूड' लिपस्टिक ही मुलींची पहिली पसंती ठरत आहे
  • कॉलेजला जाणारी मुलगी असो किंवा ऑफिसला जाणारी किंवा पार्टीला जाणारी, 'न्यूड' लिपस्टिक हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.
  • 'न्यूड' लिपस्टिकमध्येही अनेक शेड्स असतात


Nude Lipstick Facts: आजकाल 'न्यूड' लिपस्टिक्स खूप ट्रेंडमध्ये आहेत. 'न्यूड' लिपस्टिक ही मुलींची पहिली पसंती ठरत आहे. कॉलेजला जाणारी मुलगी असो किंवा ऑफिसला जाणारी किंवा पार्टीला जाणारी, 'न्यूड' लिपस्टिक हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. 'न्यूड' लिपस्टिकमध्येही अनेक शेड्स असतात. लाइट शेड्सपासून डार्क शेड्सपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. 'न्यूड' लिपस्टिक शेड्स ग्लॅम लूक देतात, पण या लिपस्टिकला 'न्यूड' का म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात असतो. चला तर मग जाणून घेऊया या लिपस्टिकला न्यूड का म्हणतात...


याला 'न्यूड' लिपस्टिक का म्हणतात?

 'न्यूड' लिपस्टिक ही त्वचेच्या टोनच्या आधारे वापरली जाणारी लिपस्टिक आहे, म्हणून तिला 'न्यूड' लिपस्टिक म्हणतात. त्याचा रंग आपल्या त्वचेच्या रंगासारखा असतो. ही लिपस्टिक चेहऱ्याच्या मेकअपला सेम टोन करते आणि सुंदर लुक देते. त्यामुळे चेहरा हलका आणि सुंदर दिसतो.या लिपस्टिकच्या अनेक शेड्स बाजारात उपलब्ध आहेत. न्यूड लिपस्टिक तुम्हाला कॅज्युअल लुक देते. जरी तुम्ही मेकअप केला नाही आणि फक्त लिपस्टिक लावली तरी ते तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला बॅलन्स करते.


'न्यूड' लिपस्टिक निवडण्याचा योग्य मार्ग म्हणजे लिपस्टिक आणि तुमच्या स्कीनचा रंग मॅच होणे. जर तुम्ही 'न्यूड' लिपस्टिक खरेदी करणार असाल तर मेकअपशिवाय जा आणि म्हणजे तुमचा स्कीन कलर आणि लिपस्टिक मॅच होईल. मग तुम्हाला योग्य कल्पना येईल. जर तुमची त्वचा गोरी असेल 
तरृ अशावेळी तुम्ही डार्क शेड्स असलेली लिपस्टिक खरेदी करावी. जर तुमची त्वचा काळी असेल, तर लाइट शेड न्यूडमध्ये ब्राऊन लाइट शेडची लिपस्टिक निवडा.


(Dislaimer: या लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि ते व्यावसायिक सल्ला म्हणून घेतले जाऊ शकत नाहीत. काहीही करण्याआधी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी