Optical Illusion of narcissist | प्रत्येकजण कमीअधिक प्रमाणात आत्मप्रौढी (narcissist ) असतोच. मात्र याचं प्रमाण जर मर्यादेपेक्षा जास्त किंवा मर्यादेपेक्षा कमी असेल तर तो मानसिक विकार (Psychological disorder) ठरतो. इंटरनेटवर आणि प्रत्यक्ष निसर्गातही भ्रम निर्माण कऱणाऱ्या किंवा भास निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. या गोष्टींचे अर्थ कोण कसं लावतं, यावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाची कल्पना येऊ शकते.
अनेकदा आपण व्यक्तींच्या बाह्यरुपाकडे पाहून त्यांना जज करत असतो, तर कधी त्यांच्यात प्रत्यक्षात नसणारे दुर्गुणही आपल्या डोळ्यांना दिसतात. एखादी गोष्ट प्रत्यक्ष जशी आहे तशी न पाहता आपण आपल्या स्वभावानुसार तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो.
इथे देण्यात आलेल्या या फोटोवरून आपण किती आणि कुठल्या बाबतीत आत्मप्रौढी आहोत, याची कल्पना करता येते. हा फोटो पाहिल्यावर सर्वप्रथम कुठली गोष्ट तुमच्या नजरेला दिसली याचा विचार करा आणि त्यावरून तुमच्या स्वभावाचा अंदाज घ्या. Yourtango.com यांनी ही टेस्ट तयार केली असून स्वतःच्या स्वभावातील दोष शोधण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
जर या चित्रात तुमचं लक्ष सर्वप्रथम महिलांकडे गेलं असेल, तर याचा अर्थ तुम्ही प्रत्येकाच्या बाह्यरुपावरून त्याला जज करता. वरवर जे दिसतं ते प्रत्यक्षात असतंच असं नाही, याची तुम्हाला कल्पना असते. मात्र तरीही तुमच्या स्वभावातील दोषामुळे संकटाच्या वेळी तुम्ही केवळ बाह्यरुप पाहून व्यक्तींवर विश्वास टाकता.
अधिक वाचा - Chanakya Niti: शत्रूला चितपट करण्यासाठी चाणक्यांच्या या धोरणांचा करा अवलंब, लगेच मिळेल विजय
जर तुम्हाला सर्वप्रथम नदी दिसली असेल, तर तुम्ही इतरांच्या सामाजिक दर्जावरून त्यांना जज करता. एखाद्या व्यक्तीची साामाजिक पत, प्रतिष्ठा किती आहे या निकषावर तुम्ही त्या व्यक्तीचं महत्त्व ठरवत असता. समाजातील यशस्वी व्यक्तींचा आदर करणे ही गोष्ट वेगळी आणि केवळ समाजात मिळणाऱ्या प्रतिष्ठेच्या जोरावरच त्या व्यक्तीला जज करणं वेगळं.
जर तुम्हाला पहिल्यांदा पूल दिसला असेल तर तुमच्याकडे करुणा फारच कमी आहे, असा अर्थ निघतो. याचा अर्थ तुम्ही क्रूर आहात किंवा व्हिलन आहात, असा नव्हे. मात्र कुठलाही निर्णय घेताना त्यामागे करुणा नसण्याचीच शक्यता असते. इतरांच्या परिस्थितीचा तुम्ही फारसा विचार करत नाही.
अधिक वाचा - Bedroom Vastu Tips : बेडरूममध्ये नका करू या चुका, घरातील सुख शांती निघून जाईल
जर तुम्हाला बोट सर्वात आधी दिसली असेल, तर त्याचा अर्थ तुम्हाला स्वतःची स्तुती ऐकल्याशिवाय चैन पडत नाही. आपण केलेल्या एखाद्या कामाचं जोपर्यंत इतरांकडून कौतुक होत नाही, तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळत नाही. तुमच्या कामाचा आनंद तुम्ही स्तुतीशिवाय घेऊ शकत नाही. एखाद्यानं तुम्हाला दिलेली वाईट प्रतिक्रिया ही दीर्घकाळ तुमच्या मनात घर करून राहते.
स्वतःपलिकडचं जग न पाहणाऱ्याला व्यक्तींना narcissist म्हटलं जातं. या व्यक्ती स्वतःच्या प्रचंड प्रेमात असतात. जगात सर्वाधिक महत्त्वाची व्यक्ती आपणच आहोत, असं त्यांना वाटत असतं. आपला अपमान ते सहन करू शकत नाहीत.