Married Women Relationship : तरुण मुलं विवाहित महिलांच्या प्रेमात का पडतात ? जाणून घ्या यामागील 5 कारणे 

जगात असे अनेक तरुण आहेत ते आपल्या वयाहून मोठ्या आणि विवाहित महिलांच्या प्रेमात पडतात. नैतिकदृष्ट्या ही बाब जरी चुकीची असली तरी ही बाब आता समाजात अस्तित्वात आहे. यामुळे अनेकवेळेला समस्या निर्माण होतात तसेच गुन्हेही घडतात. परंतु तरुण मुले आणि विवाहित महिला एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि कसेबसे रिलेशनशिप सांभाळतात.

why boys loves married women?
तरुण मुलं विवाहित महिलांच्या प्रेमात का पडतात ?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जगात असे अनेक तरुण आहेत ते आपल्या वयाहून मोठ्या आणि विवाहित महिलांच्या प्रेमात पडतात.
  • नैतिकदृष्ट्या ही बाब जरी चुकीची असली तरी ही बाब आता समाजात अस्तित्वात आहे.
  • यामुळे अनेकवेळेला समस्या निर्माण होतात तसेच गुन्हेही घडतात.

Married Women Relationship : मुंबई : प्रेम आंधळ असतं असे सांगितल जातं. प्रेमात पडल्यावर व्यक्तीला काही चुकीचे बरोबर दिसत नाही. प्रेमाला वयही नसतं असेही सांगितले जाते. जगात असे अनेक तरुण आहेत ते आपल्या वयाहून मोठ्या आणि विवाहित महिलांच्या प्रेमात पडतात. नैतिकदृष्ट्या ही बाब जरी चुकीची असली तरी ही बाब आता समाजात अस्तित्वात आहे. यामुळे अनेकवेळेला समस्या निर्माण होतात तसेच गुन्हेही घडतात. परंतु तरुण मुले आणि विवाहित महिला एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि कसेबसे रिलेशनशिप सांभाळतात. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे की खुप सार्‍या तरुणांचा कल या वयाने मोठ्या आणि विवाहित महिलांच्या बाजूने आहे. या रीसर्चमध्ये काही कारणे समोर आली आहेत. तरुण आपल्याहून मोठ्या आणि विवाहित महिलांच्या प्रेमात का पडतात जाणून घेऊया याची पाच कारणे. (five reason behind young boys fall in love with elder and married women read in marathi)

अधिक वाचा :  Expectations in relationship: कुठल्याही नात्यात असतात या पाच अपेक्षा, त्या पूर्ण करण्याचा नेहमीच करा प्रयत्न

महिलांची प्रगल्भता

तरुण मुले महिलांकडे आकर्षित होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे विवाहित महिला जास्त प्रगल्भ म्हणजेच मॅच्युअर असतात. विवाहित महिला जास्त समजूतदार असतात आणि त्या रिलेशनशिप चांगल्या हाताळतात. 


समजून घेणे

तरुण मुलींच्या तुलनेत विवाहित महिला जास्त समजूतदार असतात, या महिला मुलांच्या भावना समजून घेतात. तरुण मुलींच्या तुलनेत विवाहित महिलांवर विश्वास ठेवणे कधीची चांगले अशी मुलांची मानसिकता असते. 

अधिक वाचा :  Relationship Tips: पत्नीसोबत दररोज करा 'हे' काम... नात्यात कधीही येणार नाही दुरावा

महिलांकडून समाधान 

तरुण  मुलींच्या तुलनेत विवाहित महिलांकडून तरुणांना जास्त समाधान मिळतं. यासाठी तरुणांचा कल हा विवाहित आणि वयाने मोठ्या असलेल्या महिलांकडे असतो.

अपेक्षा पूर्ण करणे

एका मुलाच्या ज्या ज्या अपेक्षा असतात त्या एका तरुणीच्या तुलनेत एक महिला त्या अपेक्षा पूर्ण करू शकते. विवाहित महिला जास्त अनुभवी असतात, त्यांना मुलांच्य मनात काय आहे हे लवकर कळतं. 

ब्रेकअपची भिती

तरुण मुलं विवाहित महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये येणाचे एक महत्त्वाचे कारण मुलांना ब्रेकअपची भिती नसते. रिलेशनशिपच्या सुरूवातीलाच कधी तरी ही वेळ येईल असे दोघांनी गृहीत धरले असते. तसेच ब्रेकअप झाल्यास मुलांना फार दुःख होत नाही आणि यातून लवकर बाहेर पडतात. 

अधिक वाचा : Most Common Lies: अनेक पुरुष गर्लफ्रेंड, बायकोसमोर बोलतात खोटं; ही 8 वाक्यं असतात कॉमन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी