Relationship Tips: मुलांच्या ‘या’ पाच गोष्टींवर फिदा होतात मुली, विज्ञानानेही दिला दुजोरा

कुठल्याही नव्या व्यक्तीला पहिल्यांदा पाहताना त्याच्या रंगरूपाकडेच लक्ष जातं. सर्वप्रथम दिसणार्‍या गोष्टींकडे पाहूनच पुरुष आणि स्त्री एकमेकांकडे आकर्षित होत असतात. विज्ञानानेदेखील या गोष्टीची पुष्टी केली आहे.

Relationship Tips
मुलांच्या ‘या’ पाच गोष्टींवर फिदा होतात मुली  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुलींना आवडतात छोटी दाढी ठेवणारे पुरुष
  • स्वच्छतेची आवड असणारे आणि परफ्युम वापरणारे पुरुष ठरतात विशेष आकर्षण
  • स्वच्छतेची आवड असणारे आणि परफ्युम वापरणारे पुरुष ठरतात विशेष आकर्षण

Relationship Tips: जर एखाद्या व्यक्तीवर प्रभाव (Impression) पाडायचा असेल तर त्यासाठी आपलं व्यक्तिमत्व (Personality) फार महत्त्वाचं असतं, असं म्हटलं जातं. मात्र त्याचप्रमाणे फर्स्ट इम्प्रेशन हा घटकदेखील अत्यावश्यक असतो. कुठल्याही नव्या व्यक्तीला पहिल्यांदा पाहताना त्याच्या रंगरूपाकडेच लक्ष जातं. सर्वप्रथम दिसणार्‍या गोष्टींकडे पाहूनच पुरुष आणि स्त्री एकमेकांकडे आकर्षित होत असतात. विज्ञानानेदेखील या गोष्टीची पुष्टी केली आहे. जाणून घेऊया फर्स्ट इम्प्रेशन निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी.

ट्रिम्ड बिअर्ड असणारी मुले

आजकाल ट्रिम्ड बिअरची फॅशन आहे. मुलींना दाढी ठेवणारे पुरुष अधिक आवडत असल्याचं दिसून आलं आहे. ज्यांची दाढी ना फार मोठी आहे, ना अगदीच गुळगुळीत आहे, असे तरुण सध्या तरुणींना आकर्षित करतात. न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार ट्रिम्ड दाढी ठेवणाऱ्या पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होत असल्याचं दिसून आलं आहे. 

अधिक वाचा - Mental impact of lay off: नोकरी जाणं मानसिक आरोग्यासाठी घातक, टेन्शन घेण्याऐवजी करा ‘हे’ उपाय

जास्त वयाचे पुरुष

मुली साधारणपणे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आणि मॅच्युअर्ड पुरुषाला आपला पार्टनर बनवणं पसंत करत असल्याचं एका अभ्यासातून दिसून आलं आहे. आणखी एका अभ्यासातील निरीक्षणानुसार, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असणारे महिला आपला पार्टनर म्हणून त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आणि आयुष्यात स्थिर असणाऱ्या पुरुषाला प्राधान्य देतात.

फिजिकली फिट असणारे तरुण

शारीरिक दृष्ट्या सुदृढ आणि फिट असणारे तरुण तरुणींना नेहमीच जास्त आवडतात, हे यापूर्वी वारंवार सिद्ध झालं आहे. 'युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया'ने केलेल्या अभ्यासातही हीच बाब पुन्हा एकदा नमूद करण्यात आली आहे. त्याचवेळी खूप हेवी मसल्स असणाऱ्या पुरुषांसोबत दीर्घकाळ नातेसंबंध प्रस्थापित करण्यास महिला इच्छुक नसतात, असंही दिसून आलं आहे.

अधिक वाचा - टॅनिंगमुळे आलेला पायांचा काळेपणा दूर करणारे 5 उपाय

परफ्यूम वापरणारे पुरुष

सुगंध हा नेहमीच प्रत्येकाला आकर्षित करत असतो. ज्यांच्या आजूबाजूला असण्याने चांगला वास दरवळतो, असे पुरुष तरुणींना विशेष आवडतात. 2009 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार परफ्युम वापरणारे पुरुष हे इतरांच्या तुलनेत अधिक आत्मविश्वास पूर्ण असतात आणि महिलांना ते अधिक आकर्षित करतात. शरीराची दुर्गंधी येणाऱ्या तरुणांपासून दूर राहणेच तरुणी पसंत करतात. परफ्यूम लावणारे पुरुष हे आपल्यमुळे कुणाला दुर्गंध येऊ नये, याची एक प्रकारे काळजीच घेत असतात. हा गुणही तरुणींना अधिक आकर्षित करून घेतो.

स्वच्छतेबाबत जागरूक

आपल्या पेहेरावासोबतच स्वच्छतेची काळजी घेणारे पुरुष महिलांना विशेष आकर्षित करतात. स्वच्छतेची आवड असणाऱ्या पुरुषांसोबत दीर्घकाळ नातेसंबंध प्रस्थापित करणे तरुणींना आवडते. स्वच्छतेची आवड ही एक जबादारीची भावनाही असते. आपल्या पार्टनरला असलेली स्वच्छतेची सवय ही त्याच्यासोबत दीर्घकाळ राहताना आनंददायी गोष्ट असते. घाणेरड्या आणि अस्वच्छ व्यक्तींपेक्षा स्वच्छ आणि टापटीप राहणारे तरुण तरुणींना अधिक आकर्षित करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी