Chanakya Niti in marathi: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी त्यांच्या नीतिशास्त्र (NitiShastra) ग्रंथात जीवनाशी संबंधित अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य यांची समज आणि दूरदृष्टी यावरुन ओळखता येते की त्यांनी शतकांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या युगातही प्रासंगिक आहेत. चाणक्य नीति लोकांना जीवनात (life) यश मिळवण्याचा मार्ग सांगण्यासोबतच नात्यांसंबंधीच्या समस्या सोडवण्यातही मदत करत असते. आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतिमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. चाणक्याने आपल्या नीतिमध्ये मानवी जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीति जितकं ज्ञान अर्थकारण आणि समाजिक गोष्टीविषयी देते. तितक्याच महत्त्वाचे मार्गदर्शन वैवाहिक गोष्टी (Matrimonial matters)विषय देत असतात.(Follow these four measures to for strengthen marital relationship)
अधिक वाचा : लग्न सोहळ्याला EMIवर खरेदी करू शकतात सोन्याचे दागिने
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिमध्ये वैवाहिक जीवनाची दोरी मजबूत करण्याचे अनेक मार्गही सांगितले आहेत. या उपायांचा अवलंब केल्यास नात्यातील दरी संपुष्टात येऊ शकते. आचार्य सांगतात की, वैवाहिक संबंध आनंदी ठेवण्यासाठी पती-पत्नी दोघांनी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आचार्य चाणक्य यांनी नात्याचे बंध दृढ करण्यासाठी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात की वैवाहिक जीवनात कटुतेचे प्रमुख कारण राग आहे. जर पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही रागावले असेल तर त्यांच्या नात्यात नेहमीच दुरावा निर्माण होतो. रागीट स्वभावामुळे अनेकवेळा आनंदाचे क्षणही दुःखात बदलून जात असतात. म्हणूनच लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ते आपला राग सोडून नातेसंबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अधिक वाचा :रिझर्व्ह बॅंकेच्या डिजिटल रुपीची सुरूवात 1 डिसेंबरपासून
चाणक्य नीति म्हणते की, पती-पत्नीच्या नात्यात गोपनीयता असणे अत्यंत आवश्यक आहे. या नात्यात काय घडते याची माहिती कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू नये. याची काळजी घेणे ही दोघांची जबाबदारी आहे. जे नवरा-बायको त्यांच्यात घडणाऱ्या गोष्टी स्वतःकडे ठेवतात ते नेहमी आनंदी असतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की वैवाहिक नात्यात असताना पती-पत्नीने नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे. या नात्यात जे जोडपे एकमेकांच्या प्रतिष्ठेचा आदर करतात, ते नेहमीच आनंदी असतात. त्यांच्या नात्यात दुरावा नसतो. प्रतिकूल परिस्थितीत ते एकमेकांना साथ देत त्या संकटाला पळवून लावतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की, दीर्घ वैवाहिक जीवनात पती-पत्नीला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. यामुळे जीवनात आलेल्या अडचणींतून बाहेर पडण्यासाठी दोघांनी एकत्र राहण्यासोबतच संयम बाळगणे खूप गरजेचे आहे. जी जोडपी संयम गमावत नाहीत आणि एकमेकांना साथ देतात, ते प्रत्येक अडचणीवर मात करतात.