Pink Lips Tips: गुलाबी आणि सॉफ्ट ओठ बनवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; होतील चमकदार

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Oct 02, 2022 | 11:56 IST

Pink Lips Tips: ओठांची त्वचा ही संपूर्ण शरीराची सर्वात संवेदनशील त्वचा आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे आणि भेगा पडतात. यासोबतच ते काळे पडू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता.

Lips Care Tips
ओठांना गुलाबी आणि मुलायम बनवण्यासाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय 
थोडं पण कामाचं
  • तुम्हाला मेकअपशिवाय ओठ गुलाबी आणि मुलायम बनवायचे असतील तर तुम्ही यासाठी काही घरगुती उपाय (home remedies) करू शकता.
  • ओठांची त्वचा ही सर्वात पातळ आणि संवेदनशील असते.
  • तुम्‍हाला तुमच्‍या ओठांची निगा हा तुमच्‍या दैनंदिन स्‍कीन केअरचा (daily skin care routine) एक भाग बनवावा लागेल.

मुंबई: Pink Lips Tips: खराब वातावरण, पाण्याची (water)  कमतरता आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट वापर यामुळे अनेकदा ओठ (dry) कोरडे आणि फाटतात. यासोबतच स्मोकिंगमुळे ओठांचा रंगही काळा होऊ लागतो. दरम्यान याचे कारण म्हणजे ओठांची त्वचा ही सर्वात पातळ आणि संवेदनशील असते. तुम्‍हाला तुमच्‍या ओठांची निगा हा तुमच्‍या दैनंदिन स्‍कीन केअरचा (daily skin care routine) एक भाग बनवावा लागेल. जर तुम्हाला मेकअपशिवाय ओठ गुलाबी आणि मुलायम बनवायचे असतील तर तुम्ही यासाठी काही घरगुती उपाय (home remedies) करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ओठांना नैसर्गिकरीत्या मुलायम आणि गुलाबी करण्यासाठी घरगुती उपाय. 

मध आणि साखरेच्या स्क्रबने तुमचे ओठ एक्सफोलिएट करा

ओठ काळे होण्याचे मुख्य कारण म्हणजे मृत पेशी जमा होणे. मऊ आणि गुलाबी ओठांसाठी मृत त्वचा काढून टाकण्यासाठी नैसर्गिक लिप स्क्रब अत्यंत प्रभावी आहेत. यासाठी तुम्ही ब्राऊन शुगर आणि एक चमचा मध घ्या. स्क्रब तयार करण्यासाठी या गोष्टी एकत्र मिसळा. त्यानंतर या पेस्टने ओठ स्क्रब करा. यावरून तुम्हाला फरक स्पष्ट दिसेल.

अधिक वाचा- अखेर चांदणी चौकातला पूल स्फोट करून जमीनदोस्त

गुलाबी ओठांसाठी गुलाब आणि दूध

गुलाबाच्या पाकळ्या तुमच्या ओठांना नैसर्गिकरित्या पोषण, मऊ आणि गुलाबी बनवतात. यासाठी 6-7 गुलाबाच्या पाकळ्या अर्धा कप कच्च्या दुधात रात्रभर भिजवा. पाकळ्या सकाळी दुधात गाळून पेस्ट बनवा. ही पेस्ट ओठांवर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या. जर पेस्ट ओठांवर लावण्यासाठी खूप घट्ट असेल तर दुधाचे काही थेंब घाला. या रेसिपीमुळे तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी होतात.

त्वचेचा टोन सुधारण्यासाठी दूध आणि हळद

हळद हे एक सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषध मानले जाते, जे पिगमेंटेशनच्या उपचारात मदत करते. पण त्याचा वापर फक्त त्वचा उजळण्यापुरता मर्यादित नाही. दुधात हळद मिसळून वापरल्यास ओठांचा काळेपणा दूर होतो. यासाठी एक चमचे दुधात अर्धा चमचा हळद मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या ओठांवर लावा आणि सुमारे 5 मिनिटे राहू द्या. पेस्ट सुकल्यानंतर हलक्या हातांनी स्क्रब करा. आपले ओठ कोमट पाण्याने स्वच्छ करा आणि नंतर हायड्रेटिंग लिप बाम लावा.

(अस्वीकरण: या बातमीत सुचविलेल्या टिपा आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक सल्ला म्हणून समजू नये.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी