Easy Cancer Prevention Tips in Marathi: : दरवर्षी ४ फेब्रुवारीला ‘वर्ल्ड कॅन्सर डे’ जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा हेतू लोकांना कॅन्सर या आजाराबाबत जागरूक करणं हा असतो. जेणेकरून कॅन्सरच्या मृतांचा आकडा कमी करता येईल. खरंतर दरवर्षी कॅन्सरचं संकट जगभरात वाढत जात आहे. चार प्रकारच्या कॅन्सरला सर्वात धोकादायक म्हटलं गेलं आहे. यात ब्रेस्ट कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर आणि आतड्यांच्या कॅन्सरचा समावेश आहे.
कॅन्सर म्हणजे नेमकं काय?
शरीरातील कुठल्याही भागातील पेशी म्हणजेच सेल्स अनियंत्रित पद्धतीनं वाढल्या तर त्याला कॅन्सर म्हटलं जातं. अशात या पेशी हेल्दी सेल्सला खावून टाकतात.
शरीरात कोणती गाठ असल्याचं जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरातील कुठल्याही भागातून रक्तस्राव किंवा द्रव पदार्थ निघत असेल तर ते गंभीर पणे घ्या. हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. विनाकारण होणारी डोकेदुखी, वजन कमी होणं ही लक्षण दिसत असल्यासही कॅन्सरची तपासणी लगेच करावी.
कॅन्सरपासून असा करावा बचाव
रिसर्चनुसार कॅन्सरचा आजार मुख्यत्वे आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होतो. जर आपण आपल्या सवयी चांगल्या ठेवल्या तर कॅन्सरपासून आपण बचाव करू शकतो. अशातच या बाबतीत स्वत:ची काळजी घ्यावी.