Office Wear Ideas: ऑफिसमध्ये कम्फर्टेबल राहून स्टायलिश दिसण्यासाठी या टिप्स फॉलो करा

लाइफफंडा
Updated Apr 25, 2022 | 15:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Office Wear Ideas: ऑफिसमध्ये कम्फर्टेबल असताना स्टायलिश दिसणं खूप गरजेचं आहे. कारण बहुतेक लोक कपडे तर घालतात, पण त्यांना ते सूट होतातच असं नाही.

Follow these tips to stay comfortable and look stylish in the office
ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी या टिप्स फॉलो करा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कम्फर्टेबल वाटेल असेच स्टायलिश कपडे ऑफिसमध्ये घाला
  • स्टायलिश दिसताना नुसते कपडेच नाही तर फुटवेअरकडेही लक्ष द्या
  • ऑफिसमध्ये कॅज्युअल कपडे घालू नका, तुमच्या लूकमुळे तुमची वागणूकही कॅज्युअल वाटते.

Office Wear Ideas For Good Personality: तुम्हाला हवे तसे कपडे घाला, पण जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. बहुतेक लोक स्टायलिश दिसण्यासाठी चांगले कपडे घालतात, परंतु ते कम्फर्टेबल नसतात. ऑफिसमध्ये छान दिसण्यासोबतच कम्फर्टेबल असणं किती महत्त्वाचं आहे हे नोकरदार महिलांना चांगलंच माहीत असतं. चला तर मग जाणून घेऊया ऑफिसमध्ये कम्फर्टेबल राहून स्टायलिश कसे दिसावे.

कॅज्युअल ड्रेस घालू नका


सर्वप्रथम, ऑफिसला जाताना कॅज्युअल ड्रेस घालणे टाळावे. ऑफिसमधला कॅज्युअल लूकही तुमची कॅज्युअल वागणूक दाखवतो, तर प्रोफेशनल लूक तुमची गंभीरता दाखवतो. मात्र, तुम्ही आठवड्यातून एकदा कॅज्युअल ड्रेस घालू शकता.


साईज आणि कम्फर्ट महत्त्वाचा आहे

साईज आणि कम्फर्टदेखील लक्षात ठेवा. परफेक्ट फिटिंग आणि कम्फर्ट यांच्यात योग्य संतुलन राखणे फार महत्वाचे आहे. आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की चांगले फिटिंग कपडे तुम्‍हाला प्रेझेंटेबल बनवतात आणि खूप घट्ट कपडे तुम्‍हाला अस्वस्थ करतात. त्यामुळे ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा, जे परिधान करून तुम्ही आरामात बसू शकाल. तुम्ही पाहिलेला कोणताही ट्रेंड कधीही फॉलो करू नका, कारण ते तुम्हाला शोभतील असे नाही. 


तुम्हाला आत्मविश्वास वाटेल असेच कपडे घाला

नेहमी अशा प्रकारे कपडे घाला की ज्यात तु्म्हाला आत्मविश्वास वाटेल. ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा, जे परिधान करून तुम्हाला आत्मविश्वास वाटेल. रंग किंवा फॅब्रिकमध्ये कोणत्याही प्रकारची विशेष निवड असेल तर त्याला प्राधान्य द्या, कारण कुठेतरी आत्मविश्वास तुमच्या कामावरही परिणाम करतो.


कपड्यांसोबतच फुटवेअरचाही विचार करा

कपड्यांसोबतच फुटवेअरवरही भर द्यावा लागेल. महिलांचे बहुतांश लक्ष कपड्यांवरच असते. फुटवेअर निवडताना त्या ब्रँड आणि दर्जाकडे फारसे लक्ष देत नाहीत. म्हणूनच तुम्ही चांगले दिसत नाही. कपडे आरामदायक कम्फर्टेबल असणे किती महत्त्वाचे आहे, ते फुटवेअरसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. बहुतेक लोक पहिल्यांदा तुमच्या फुटवेअरकडे लक्ष देतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी