Personality Tips : माणूस हा समाजशील प्राणी आहे. आपण नियमितपणे अनेकांना भेटत असतो. मात्र भेट झाल्यानंतर (meeting people) काही वेळातच आपल्याविषयी समोरच्या व्यक्तीचं मत खराब (Bad Impression) होत असल्याचं किंवा आपला प्रभाव कमी होत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. असं होण्यामागे काही कारणं (reasons) असतात. समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना (Communication) आपण कसे वागतो, आपली देहबोली कशी असते या बाबींचा फरक तर पडतोच. याशिवाय आपल्या काही शारीरिक हालचालींचाही त्यावर प्रभाव पडत असतो. आपल्या नकळत आपलं वागणं समोरच्या व्यक्तीवर वाईट प्रभाव टाकत असतं. त्यासाठी अशा सवयी जाणून घेणं आणि आपल्याला जर त्या सवयी असतील, तर त्यातून आपली सुटका करून घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊया अशाच काही सवयींविषयी.
एखाद्या व्यक्तीशी बोलताना तुम्हाला जर तुमचे हात पाठिमागे बांधून उभे राहण्याची सवय असेल, तर त्यावर मात करा. मानसतज्ज्ञांच्या मते असं केल्यामुळे समोरच्या व्यक्तीवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. आपल्याला जेव्हा राग येतो किंवा आपला मूड जातो, तेव्हा आपण नैसर्गिकरित्या हात मागे बांधतो. मात्र हा सवयीचा भाग झाला, तर मात्र आपलं फर्स्ट इंप्रेशनच खराब होण्याची शक्यता असते.
समोरच्या व्यक्तीशी उभे राहून जर तुम्ही बोलत असाल, तर पाय क्रॉस करून अजिबात उभे राहू नका. त्यामुळे तुमच्याविषयी असणारा मनातील आदर कमी होण्याची शक्यता असते. तुम्ही जे बोलता आहात, त्याबाबत तुम्ही स्वतःच ठाम नाही, असं समोरच्या व्यक्तीचं इंप्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला इतर कुणीही गांभिर्याने घेण्याची शक्यता कमी होते.
अनेकांना बोलताना हातांचं काय करायचं, ते कळत नाही. त्यामुळे ते हाताची घडी घालून उभे राहतात. काहीजण दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंतवून ठेवतात. तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोअर होत आहात, असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे हात मोकळे सोडा आणि त्याकडे बिलकूल लक्ष देऊ नका.
अधिक वाचा - Mobile In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करणे तब्येतीसाठी घातक
कुणाशीही संवाद साधताना चेहऱ्याला वारंवार हात लावण्याची सवय काहीजणांना असते. तुम्ही जर वारंवार चेहऱ्याला हात लावत असाल तर तुम्ही काहीतरी लपवता आहात, असा आभास समोरच्या व्यक्तीला होत राहतो. मानसतज्ज्ञांच्या मते जेव्हा माणसं खोटं बोलत असतात, तेव्हा वारंवार ती चेहऱ्याला हात लावत असतात.
बोलताना कुणाकडेही थेट बोट दाखवणं, हे असभ्यतेचं लक्षण मानलं जातं. कुणालाही आपल्या दिशेनं थेट बोट दाखवलेलं आवडत नाही. तुम्हाला जर तशी सवय असेल तर वेळीच ती बदलणं गरजेचं आहे.