पार्टनरला सकाळी ‘या’ आठ रोमँटिक पद्धतीनं उठवा, या प्रेमळ गोष्टी नात्यातील रोमांस वाढवेल

Tips to Wake up Your Partner in Morning: रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि रोमांस कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे की, आपण आपल्या पार्टनरसोबत सकाळची सुरूवात रोमँटिक पद्धतीनं करावी. जाणून घ्या कशी ती...

Representational image (Source- Unsplash)
पार्टनरचा मूड चांगला करायचाय,सकाळी उठवा ‘या’ ८ रोमँटिक पद्धत  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

 • बोटांनी स्पर्श करून सकाळी-सकाळी पार्टनरला उठवा.
 • पार्टनरपासून दूर असाल तर सकाळी-सकाळी एक रोमँटिक कॉल करा.
 • कधीही भांडून करू नका सकाळची सुरूवात

Romance: सकाळच्या वेळी पार्टनरला उठवणं अनेकदा कंटाळवाण असतं. दररोज एकसारखं रूटीन आणि पार्टनर (Partner) न उठल्यामुळे होणारी चीडचीड, अनेकदा आपल्या नात्यातील दुरावा वाढवू लागते. जर सकाळची सुरूवात जर भांडणानं होत असेल तर नात्यातील प्रेम हळुहळू गायब होऊ लागतो. मात्र, अशा काही टिप्स आहेत, ज्यामुळे सकाळची सुरूवात रोमँटिक (Romantic Morning) होऊ शकते. या टिप्सनुसार जर आपण आपल्या पार्टनरचा मूड चांगला करू शकलात तर आपल्याला पण त्याला उठवणं आवडायला लागेल. जाणून घ्या या टिप्स (Tips) वर, ज्या सकाळी पार्टनरला उठविण्यासाठी उपयोगी पडू शकतात.

 • या पद्धतीनं सकाळी पार्टनरला उठवा, रोमांसनं भरेल आयुष्य...

 • सकाळी-सकाळी पार्टनरला उठवण्यासाठी आपले बोटं त्याच्या शरीरावर हलक्या हातानं फेरा. या प्रेमळ स्पर्शामुळे आपल्या पार्टनरला जाग येईल आणि प्रेमाचा ओलावा जाणवेल. आपण आपल्या जोडीदाराच्या कपाळावर, केसांवर हात फेरावा. प्रत्येक पार्टनरसाठी ही सकाळ मग सुंदर सकाळ होईल.
 • प्रेमाच्या स्पर्शासोबतच पार्टनरला जर आपण किस मिल दिलं तर विचारायलाच नको. कदाचितच कुणी असा असेल ज्याला हा स्पर्श आणि किस आवडणार नाही आणि यानंतर कुणी उठणार नाही. आपली ही पद्धत झोप तर उडवेलच आणि एका सुंदर दिवसाची रोमँटिक सुरूवात होईल.
 • आपल्या पार्टनरला उठविण्यासाठी आपण त्याच्या कानांमध्ये काही रोमँटिक गोष्ट बोलू शकता, किंवा आदल्या दिवशीची रात्र आपण कशी रोमँटिक घालवली होती, त्याची आठवण करून द्या. थोडं लाडवत आपण पार्टनरची छेड पण काढू शकता.
 • जर आपण आपल्या पार्टनरपासून दूर असाल तर आपण त्याच्यासाठी एक प्रेमळ कॉल करून त्याला उठवू शकता. दूर राहून आपण प्रेमळ फोन केला तर आपल्यामधील रोमांस कायम राहतो. तसंच झोपेतून उठविण्यासाठी आपण पार्टनरला असा स्पेशल मॅसेज देऊ शकता किंवा लव्ह यू म्हणून प्रेमाची आठवण करून देऊ शकता.
 • एकमेकांसाठी कुठला तरी सरप्राईज मॅसेज प्लान करून पाठवू शकता. जो मॉर्निंगमध्ये रोज ठरलेल्या वेळी पार्टनरला मिळेल. पार्टनरसाठी दररोज एक खास नोट लिहून ठेवा. यामुळे आपल्या पार्टनरला आपल्या नोटची वाट पाहण्याची इच्छा राहिल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला काही खास मॅसेज मिळेल.
 • जर आपला पार्टनर फूडी असेल तर सर्वात मस्त आणि चांगला पर्याय आहे की, त्यासाठी आपण त्याच्या आवडीचा नाश्ता तयार करून मग त्याला उठवावं. प्रेमानं उठवतांना मस्त नाश्तासोबत सकाळ खूप चांगली होईल.
 • नवीन लग्न झालेल्या कपलसाठी तर एक स्पेशल पद्धत आहे की, झोपेतून उठवल्यानंतर आपण दोघं एकत्र आंघोळ करू शकता. मॉर्निंग शॉवरमुळे आपला दिवस आणि आपल्या पार्टनरचा दिवस रोमँटिक जाईल.
 • मॉर्निंग सेक्स पण आपण ट्राय करू शकता. आपल्याला तो क्षण आपल्या रोमँटिक क्षणापेक्षा एक लेव्हल वर घेऊन जावा लागेल. सकाळच्या वेळी लव्हमेकिंग सेशन पेक्षा दुसरा रोमँटिक क्षण दुसरा कुठलाही असू शकत नाही.

या टिप्स फॉलो केल्या तर आपल्या आयुष्यातील रोमँटिक क्षण नेहमीच एक्टिव्ह राहू शकतात. तेव्हा नक्की ट्राय करून बघा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी