Mental health | नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्ती यशस्वी (Successful)होऊ शकते. मात्र त्यासाठी काही कौशल्ये मिळवण्याबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वावरदेखील (personality) मेहनत घ्यावी लागते. आपल्यातील काही दुर्गुण बाजूला सारावे लागतात. अनेकवेळा आपल्याला असे वाटते की आपण खूप प्रयत्न करत आहोत मात्र आपल्याला यश मिळत नाही. काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला यश मिळण्यापासून थांबवत आहेत. यश मिळवण्यासाठी तुम्हाला चांगले विचार (Good thoughts) आणि चांगल्या सवयी (good habits) अवलंबल्या पाहिजेत. आपले विचार आणि सवयीच आपल्या मानसिक आरोग्यावर (mental health)प्रभाव टाकतात. त्याचा परिणाम आपल्या कृतीवर होत असतो. त्यामुळे यशस्वी व्हायचे असेल तर शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच (physical fitness) मानसिक आरोग्याकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. यशस्वी व्हायचे असेल तर काही गोष्टींपासून सावध राहिले पाहिजे. (For success mental fitness, good habits are very important)
अनेकवेळा आपल्याला वाटते की दुसरी कोणीतरी व्यक्ती ही यशस्वी आहे. त्यांनी जी यशाची व्याख्या केली आहे तीच योग्य आहे. मात्र प्रत्येकासाठी यशाची व्याख्या वेगवेगळी असते. त्यामुळे आपली यशाची व्याख्या शोधा. आपला मार्ग स्वत: निर्माण करा.
आपण स्वत:शी प्रामाणिक असणे अत्यंत महत्त्वाचे असते. कोणताही निर्णय घेताना आपल्या मनाचा कौल नक्की घ्या. तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा. इतरांच्या दबावात किंवा इतरांचे मन राखण्यासाठी कोणताही निर्णय घेऊ नका किंवा काम करू नका. आपल्या मनातील बाबींकडे दुर्लक्ष करू नका.
तुम्हाला ज्या कामात आनंद वाटत असेल तेच काम करा. यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमचे पूर्ण योगदान देणे आवश्यक असते. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा तुम्ही आपल्या आवडीचे काम करता. तुमची सर्वोत्तम कामगिरी तुमच्या आवडत्या कामातच देते येते. त्यामुळे न आवडणारे काम करत असाल तर यशाची अपेक्षा करू नका.
यश दाखवण्यासाठी तुम्हाला आराम सोडावा लागेल. तुमच्या सोयीच्या आणि तुम्हाला फारसा त्रास न देणाऱ्या आयुष्यातून बाहेर पडावे लागले. यश हवे असेल तर तुमचे कंफर्ट झोन सोडावे लागेल. नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, नवीन गोष्टी कराव्या लागतील. कंफर्ट झोन तुम्हाला हे करण्यापासून रोखतो. कारण त्यात धोका नसतो, मेहनत नसते, त्रास नसतो. मात्र यशस्वी व्हायचे असेल तर चाकोरीबाहेर जावेच लागेल.
यश हे काही पहिल्याच प्रयत्नात मिळत नाही. अपयश पचवायला शिका. अपयशातूनच यशाचा मार्ग स्पष्ट होत जातो. अपयशानेच आपण अधिक परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अपयशाची भीती बाळगू नका. अपयशाला सकारात्मकपणे, खुल्या मनाने स्वीकारा. अपयशाची भीती दूर सारल्यावरच तुम्हाला यश गाठता येईल.