Today in History  : Wednsday, 3rd August 2022:  आज आहे स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती.
 • हिंदुस्तान टाइम्सचे संपादक आणि महात्मा गांधींचे पुत्र देवदास गांधी यांचा स्मृतीदिन.
 • स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अमेरिका - ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले.

Today in History: Wednsday, 3rd August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. (freedom fighter krantisinh nana patil birth anniversary know more today in history 3rd august 2022)


३ ऑगस्ट घटना - दिनविशेष

 1. २००४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अमेरिका - ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले.
 2. २०००: शाजी एन. करुण - मल्याळी दिग्दर्शक, यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
 3. १९९७: स्काय टॉवर, ऑकलंड, न्यूझीलंड - या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंगइमारतीचे उदघाटन.
 4. १९९४: अनिल विश्वास - संगीतकार, यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
 5. १९७७: TRS-८० कॉम्पुटर - टँडी कॉर्पोरेशन कपंनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकांची घोषणा केली.
 6. १९६०: नायजेरिया - देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
 7. १९४९: नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन - बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका आणि नॅशनल बास्केटबॉल लीग यांनी विलीनीकरण करून या असोसिएशनची स्थापन.
 8. १९४८: भारतीय अणूऊर्जा आयोग (Indian Atomic Energy Commission) - स्थापना झाली.
 9. १९४०: दुसरे महायुद्ध - इटालियन सैन्याने ब्रिटीश सोमालीलँडवर आक्रमण सुरू केले.
 10. १९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
 11. १९१४: एडॉल्फ हिटलर - यांनी बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडेस्वतःला सैन्यात दाखल करून घ्यावे असा अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती झाली.
 12. १९१४: पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध घोषित केले, तर रोमानियाने आपली तटस्थता जाहीर केली.
 13. १९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी - स्थापन झाली.
 14. १८५९: अमेरिकन डेंटल असोसिएशन - ची स्थापना न्यूयॉर्क, अमेरिका येथे झाली.
 15. १८११: जंगफ्राऊ शिखर - या बर्नीज आल्प्स पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जोहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यांनी पहिली चढाई केली.
 16. १७८३: माउंट असामा ज्वालामुखी उद्रेक, जपान - या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किमान ३५ हजार लोकांचे निधन.
 17. १०४६: सांताक्लॉज लँड, थीम पार्क - जगातील पहिले थीम पार्क सांताक्लॉज, इंडियाना, अमेरिका येथे उघडले.


३ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

 1. १९८४: सुनील छेत्री - भारतीय फुटबॉलपटू - पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न
 2. १९६०: गोपाल शर्मा - भारतीय क्रिकेटपटू
 3. १९५६: बलविंदरसिंग संधू - भारतीय क्रिकेटपटू
 4. १९३९: अपूर्व सेनगुप्ता - भारतीय क्रिकेटपटू
 5. १९२४: लिऑन युरिस - अमेरिकन कादंबरीकार (निधन: २१ जून २००३)
 6. १९१६: शकील बदायूँनी - गीतकार आणि शायर (निधन: २० एप्रिल १९७०)
 7. १९००: क्रांतिसिंह नाना पाटील - स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकीय नेते (निधन: ६ डिसेंबर १९७६)
 8. १८९८: उदयशंकर भट्ट - आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार (निधन: २८ फेब्रुवारी १९६६)
 9. १८८६: मैथिलिशरण गुप्त - हिंदी कवी - पद्म भूषण (निधन: १२ डिसेंबर १९६४) 


३ ऑगस्ट निधन - दिनविशेष

 1. २०२०: जॉन ह्यूम - आयरिश राजकारणी - नोबेल पुरस्कार (जन्म: १८ जानेवारी १९३७)
 2. २००७: सरोजिनी वैद्य - लेखिका (जन्म: १५ जून १९३३)
 3. १९९३: स्वामी चिन्मयानंद सरस्वती - अध्यात्मिक गुरू (जन्म: ८ मे १९१६)
 4. १९५७: देवदास गांधी - हिंदुस्तान टाइम्सचे संपादक, महात्मा गांधींचे पुत्र (जन्म: २ ऑक्टोबर १९००)
 5. १९३०: व्यंकटेश बापूजी केतकर - आंतरराष्ट्रीय गणिती व ज्योतिर्विद (जन्म: १२ जानेवारी १८५४)
 6. १९२९: एमिल बर्लिनर - ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक (जन्म: २० मे १८५१)
 7. १८८१: विल्यम फार्गो - अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: २० मे १८१८)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी