Friendship Day: फ्रेंडशिप डेला द्या आपल्या मित्रांना हे खास गिफ्ट, मित्रही होतील खुश

लाइफफंडा
Updated Jul 31, 2019 | 18:00 IST

फ्रेंडशिप डे ४ ऑगस्टला सेलिब्रेट केला जाणार आहे. अशावेळी आम्ही आपल्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. जाणून घ्या त्याबाबत 

gift
Friendship Day: फ्रेंडशिप डेला द्या आपल्या मित्रांना हे खास गिफ्ट, मित्रही होतील खुश  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: आयुष्यात मित्र हे कायमच महत्त्वाचे असतात. ज्यांच्या आयुष्यात खरे मित्र नसतात तो आपल्या आयुष्यातील अमूल गोष्ट गमावून बसलेले असतात. त्यामुळे खरी मैत्री सेलिब्रेट करण्यासाठी प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदाचा फ्रेंडशिप डे जर आपल्याला आणखी खास पद्धतीने साजरा करायचा असेल तर आम्ही आपल्यासाठी काही छान टिप्स घेऊन आलो आहोत. तर मग जाणून घ्या कसा सेलिब्रेट कराल फ्रेंडशिप डे. 

फ्रेंडशिप डेसाठी आता फक्त ३ दिवस शिल्लक आहे. अशावेळी आपण नक्कीच विचार करत असाल की, मित्रासाठी काय गिफ्ट देऊ. जे अनेक वर्ष एकमेकांचे मित्र आहेत अशी लोकं नक्कीच मित्रांसाठी गिफ्ट घेतात. तुमच्या भावना तुमच्या मित्रांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहचविण्यासाठी गिफ्ट हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुले तुमच्या मित्रासाठी काय गिफ्ट घ्यावं याबाबत आम्ही तुम्हाला काही माहिती देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला काही अशा गिफ्ट आयडिया सांगणार आहोत की, जे आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला देऊ शकता. 

सुंदर प्लांट पॉट
एक छोटंसं हिरवंगार असं रोपटं आपल्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य फुलवतं. अशावेळी आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला हे सुंदर गिफ्ट नक्की देऊ शकता. अशा प्रकारचे प्लांट आपण अगदी आरामात आपल्या ऑफिसमधील डेस्कवर ठेऊ शकतात. यामुळे आपल्याला वर्कस्पेसमध्ये तणाव मुक्त वाटेल. 

ब्रेसलेट 
काही मुलींना ज्वेलरी फारच आवडतात. अशावेळी आपण आपल्या एखाद्या मैत्रिणीला ब्रेसलेट देऊ शकता. ज्यामध्ये आपल्या दोघांच्या नावाचं पहिलं अक्षर असेल. असे ब्रेसलेट घालून तुमची मैत्रीण ही आरामात कॉलेजला किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो. 

स्लिंग किंवा जिम बॅग
जर आपल्या एखाद्या मित्राला वर्कआऊट करणं आवडत असेल तर आपण त्याला जिम बॅग देऊ शकता. याशिवाय आपण वेगवेगळ्या स्टायलिश स्लिंग बॅग देखील देऊ शकता. 

गॅझेट गिफ्ट करा
आपण आपल्या मित्राला लेटेस्ट गॅझेट गिफ्ट करु शकता. जसं की, एखादा चांगला लॅपटॉप किंवा एखादं घड्याळ, हेडफोन. याशिवाय आपल्या मित्राला एखाद्या दुसऱ्या गॅझेटची गरज असल्यास ते देखील आपण त्याला गिफ्ट करु शकता. 

सब्सक्रिप्शन देऊ सकता 
सध्या नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अमेझॉन प्राइम याची आजकाल तरुणाईला चटकच लागली आहे. जर आपल्या मित्रांना देखील अशीच आवड असेल तर आपण आपल्या मित्राला यापैकी कोणत्याही एका प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन देऊ शकता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Imported Sunglasses| ₹ 999 INR included shipping | Buy now | COD AVAILABLE | WhatsApp Now | 8588058196 |

A post shared by LUXURY D'ALLURE (@luxurydallureofficial) on

सनग्लासेस
जर आपल्या मित्राला फिरण्याचा शौक असेल तर आपण त्याला रिफ्लेक्टर सनग्लासेस देऊ शकता.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...