Friendship Day 2020: फ्रेंडशिप डे निमित्त मराठी शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Friendship Day 2020 messages: फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री दिन... हा दिवस प्रत्येकजण मोठ्या उत्साहात साजरा करतो. एकमेकांना शुभेच्छा देत असतात. असेच काही शुभेच्छा देणारे मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Friendship Day
फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा 

थोडं पण कामाचं

  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस 
  • सोशल मीडियात व्हायरल झालेले काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 
  • व्हायरल होणारे हे मेसेज तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना पाठवून फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देऊ शकता

Friendship Day 2020 messages: फ्रेंडशिप डे (Friendship Day 2020) अर्थात मैत्री दिन हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. जगभरातील विविध देशांमध्ये फ्रेंडशिप डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. २७ एप्रिल २०१७ रोजी युनायटेड नेशन्सच्या जनरल एसेंब्लीमध्ये ३० जुलैला अधिकृतपणे जागतिक फ्रेंडशिप डे साजरा करण्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र, भारतासह अनेक देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदाचा फ्रेंडशिप डे हा २ ऑगस्ट (2 August 2020) रोजी सेलिब्रेट केला जाणार आहे. 

दरवर्षी फ्रेंडशिप डेच्या दिवशी मित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटतात. मजा-मस्ती करतात. फ्रेंडशिप बँण्ड्स हातांवर बांधतात तसेच गिफ्ट्स सुद्धा देतात. मात्र, यंदा कोरोनाचं सावट असल्याने फ्रेंडशिप डे केवळ शुभेच्छा देऊनच साजरा करावा लागणार आहे. पण काळजी करु नका आम्ही तुमच्यासाठी फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस घेऊन आलो आहोत ज्यांच्या सहाय्याने तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा (Friendship Day messages) देऊ शकतात. पाहूयात सोशल मीडियात व्हायरल झालेले काही मेसेजेस...

(फोटो सौजन्य: BCCL)

हॅप्पी फ्रेंडशिप डे 
मैत्री नावाच्या नात्याची
वेगळीच असते जाणीव
भरून काढते आयुष्यात
प्रत्येक नात्यांची उणीव....

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

पण जीवन देणाऱ्य मातीला
आणि प्रेम देणाऱ्या माणसांना
कधी विसरु नका .!
मैत्री दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

श्वासातला श्वास असते मैत्री....
ओठातला घास असते मैत्री....

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

मैत्रीच नातं कस जगावेगळ असतं ...
रक्ताचं नसल तरी मोलाच असतं...
मैत्री म्हणजे आयुष्याच्या प्रवासात सोबत असलेले खात्रीपूर्वक नातं...!
जागतिक मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

(फोटो सौजन्य: iStockImages)

मैत्री हे एक नातं आहे ,जे कायम जपायचं असतं .
एकमेकांच्या यशासाठीआपलं सर्वस्व अर्पण करायचं असतं .
जीवनाच्या या वाटेवरतुझी नी माझी मैत्री जिवंत राहू दे.
तुझ्या काही आठवणींवर माझाही हक्क राहू दे
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

निखळ आणि निस्वार्थी भावना असावी...
तुझी आणि माझी साथ कायम रंगावी...
तुझी माझी मैत्री अशी जगी गाजावी...
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: BCCL)

मित्र म्हणजे एक आधार
एक विश्वास
एक आपूलकी
आणि एक अनमोल साथ
जी मला मिळाली तुमच्या रूपाने!!
 
मैत्री दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा
 हॅप्पी फ्रेंडशिप डे

(फोटो सौजन्य: BCCL)

ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते…!
मैत्रीत फक्त जीव लावायचा असतो.

जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

(फोटो सौजन्य: BCCL)

तुझी-माझी #मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा...
सर्वांना #मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी