मुंबई: मैत्रीचा विशेष दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे (Friendship Day 2020). हा दिवस जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस विशेष करून मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी सेलिब्रेट केला जातो. यावर्षी फ्रेंडशिप डे (International Friendship Day 2020) २ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. खरं तर दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी (August First Sunday) फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या निमित्तानं मित्र एकमेकांना गिफ्ट्स (Gifts) देतात आणि पार्टी (Party) करतात. याशिवाय भारतातील अनेक शाळांमध्ये सुद्धा मुलं एकमेकांना फ्रेंडशिप बँड्स बांधतात. यासाठी लहान मुलं एक महिन्याआधीपासूनच आपल्या पॉकिट मनीमधून पैसे वाचवत असतात. जेणेकरून आपल्या बेस्ट फ्रेंडला ते गिफ्ट देऊ शकतील.
फ्रेंडशिप डे जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. पण परागुआ एक असा देश आहे, जिथं पहिल्यांदा १९५८ मध्ये आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव पास केला गेला होता. मात्र असं म्हणतात की, १९३० साली जॉयस हॉलनं हॉल्मार्क कार्ड्सपासून या दिवसाची सुरूवात केली होती. यानंतर संयुक्त राष्ट्रानं ३० जुलैला आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचं जाहीर केलं. यानंतर २७ एप्रिल २०१७ रोजी युनायटेड नेशन्सच्या जनरल एसेंब्लीमध्ये ३० जुलैला अधिकृतपणे जागतिक फ्रेंडशिप डे साजरा करण्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र भारतात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
जगभरातील देशांमध्ये विविध दिवशी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघानं ३० जुलैला आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याची घोषणा केली होती. मात्र भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. ओहायोच्या ओर्बलिनमध्ये ८ एप्रिलला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
मायक्रो ब्लॉगिंग साईटवर आज दिवसभर #FriendshipDay ट्रेंडिंग होत होतं. अनेक जणांनी आज फ्रेंडशिप डे साजरा केला. त्यासंबंधी शुभेच्छा दिल्यात. तर अनेकांना या दिवसाबाबत गोंधळ झाला. तेव्हा जाणून घ्या ३० जुलैला जागतिक फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. तर भारतात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी म्हणजे यावर्षी २ ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा होणार आहे.
तर मग आपणही आपल्या मित्रांसोबत साजरा करा फ्रेंडशिप डे.