साली, बाप, नाना पासून ते काला बकरा, सूअर अशी आहेत रेल्वे स्टेशनची नावे

लाइफफंडा
Updated Oct 11, 2021 | 15:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Funny Railway Station Names in India: भारतात असे काही रेल्वे स्टेशन्स आहेत ज्याची नावे ऐकून तुम्ही नक्कीच पोट धरू हसाल. 

railway stations
साली, बाप, नाना पासून ते काला बकरा, सूअर अशी आहेत रेल्वे स्टेशनची नावे 

थोडं पण कामाचं

  • भारत अजबगजब रेल्वे स्टेशन्सची नावे
  • नाना, बाप, सालीपासून ते काला बकरा, कुत्ता, बिल्ली ही आहेत स्टेशन्सची नावे
  • ही विचित्र नावे ऐकून तुम्हाला नक्कीच येईल हसू

मुंबई: या जगात अजबगजब वस्तूंची काही कमतरता नाही. वेळोवेळी याचे खुलासे झाले आहेत. अनेकदा अशाही गोष्टी समोर येतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होता. अशातच आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा रेल्वे स्टेशनबद्दल सांगणार आहोत ज्याची नावे ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. जाणून घ्या भारतातील या विचित्र रेल्वे स्टेशनबद्दल

साली रेल्वे स्टेशन

हे नाव ऐकून तुम्हाला नक्कीच बसू आले असेल. तुम्ही विचार कराल की हे नाव कसे असू शकते. आम्ही सांगतो अशा नावाचे रेल्वे स्टेशन आहे. साली रेल्वे स्टेशन हे जोधपूरमध्ये आहे. हे उत्तर-पश्चिम रेल्वेला आहे. येथून अजमेरचे अंतर साधारण ५३ किमी आहे. 

बाप रेल्वे स्टेशन

हे रेल्वे स्टेशनही जोधपूरमध्ये येते. मात्र हे खूप छोटे स्टेशन आहे. 

नाना रेल्वे स्टेसन

हे रेल्वे स्टेशनही राजस्थानात येते. नाना रेल्वे स्टेशन हे सिरोही पिंडवारा नावाच्या जागेवर आहे. नाना या रेल्वे स्टेशनपासून उदयपूर जवळ आहे. 

काला बकरा रेल्वे स्टेश

काला बकरा रेल्वे स्टेशन पंजाबच्या जालंधरमध्ये आहे. हे ठिकाण 'गुरबचन सिंह'नावाच्या सैनिकासाठी ओळखले जाते. यांचा ब्रिटीश सरकारच्या काळात सन्मान झाला होता. 

सूअर रेल्वे स्टेशन

आतापर्यंत तुम्ही सूअर हे प्राण्याचे नाव ऐकले असेल. मात्र याचे रेल्वे स्टेशनही आहे. हे रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातयेते. याच्या जवळ रामपूर, अमरोहा, मुरादाबाद अशी स्थानके आहेत. 

दीवाना रेल्वे स्टेशन

दीवाना रेल्वे स्टेशन हे हरयाणा जिल्ह्याच्या पानिपत जिल्ह्यात आहे. यावर दोन प्लॅटफॉर्म आहेत जेथे १६ रेल्वे थांबतात. 

भोसरी रेल्वे स्टेशन

हे रेल्वे स्टेशन पुण्यात येते. आधी या जागेला भोजपूर नावाने ओळखले जात होते. 

दारू रेल्वे स्टेशन 

दारू रेल्वे स्टेशन हे झारखंडच्या हजारीबाद जिल्ह्यात येते. येथे एका गावाचे नाव दारू आहे त्यामुळे या स्टेशनला हे नाव पडले. 

कुत्ता रेल्वे स्टेशन

कुत्ता रेल्वे स्टेशन कर्नाटकात येते. कूर्ग क्षेत्राच्या जवळ वसलेले एक छोटेसे गाव कुत्ता. 

बिल्ली रेल्वे स्टेशन

बिल्ली रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात स्थित आहे. येथे एका गावाचे नाव बिल्ली आहे. यामुळे या स्टेशनचे नाव बिल्ली पडले. 

भैंसा रेल्वे स्टेशन

भैंसा रेल्वे स्टेशन तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यात आहे. येथे एका गावाचे नाव भैंसा आहे. यामुळे या स्टेशनचे नाव हे पडले. 

सहेली रेल्वे स्टेशन

सहेली नावाचेही स्टेशन असू शकते का?  हे रेल्वे स्टेशन भोपाळ आणि इटारसी यांच्या जवळ आहे. हे नागपूर डिव्हीजनमध्ये येते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी