वाढतं वजन तुमच्या काळजीचं कारण? मग वापरा या बेसिक टिप्स...

वजन मेंटेन असणं ही सध्याच्या काळाची गरज आहे.. सुडौल बांधा प्रत्येकाचं स्वप्न आहे. तर दुसरीकडे, वाढणारं वजन दैनंदिन आयुष्यावर परिणाम करतंय.

Gaining weight is cause of your worries? use these tips
बेसिक टिप्स वापरून वजन कमी करा...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी बेसिक टिप्स...
  • पाणी... फायबरयुक्त पदार्थ... योग्य व्यायाम करा
  • वाढतं वजन बनलंय काळजीचं कारण

मुंबई : वाढणारं वजन ही सध्या समस्या बनत चाललीय. घरातील एखादा तरी व्यक्ती वाढत्या वजनामुळे चिंतेत आहे. 
खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केल्यास वाढणारं वजन आटोक्यात येऊ शकतं. वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायामासह 
छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणंसुद्धा गरजेचं आहे.

वजन कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

1. संपूर्ण धान्य खा. 
2. मानसिक तयारी
3. आपण काय जेवतोय त्याकडे लक्ष द्या.
4. पाणी, हे वजन कमी करण्याचं मुख्य साधन
5. कमीत कमी जेवण्यासाठी  स्वत:ला उद्युक्त करा.
6. जेवणात फायबरचा वापर करा.
7. शरीरातील साखरेची मात्रा कमी करा.

8. व्यायाम करा.


डाएटसोबतच खालील गोष्टीही लक्षात ठेवणं गरजेचं....


चहात साखरेऐवजी गूळ घाला

तुम्हाला जर एकसारखा चहा पिण्याची सवय असेल तर अर्थातच तुमच्या शरिरात साखरेचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे चहात साखरेऐवजी गुळ घाला. 
वजन कमी होण्यास मदत होईल. 


भरपूर पाणी प्या...

पाणी जास्तीत जास्त प्या.. सकळी उठल्यावर रिकाम्यापोटी 1 ते 2 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. त्यामुळे
भूक कमी लागते. आणि शरिरातील चरबीही वितळण्यास मदत होते. 


तेलकट खाणं टाळा

पिझ्झा, बर्गर, इत्यादी फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणं टाळा. 

हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा

आहारात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. हिरव्या पालेभाज्या आणि सॅलेडमुळे वजन नियंत्रणात राहते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी