Raksha Bandhan ला तुमच्या बहिणींना द्या लाईफलाॅंग गिफ्ट, पाहा 5 सर्वोत्तम आर्थिक स्थैर्याच्या भेटवस्तू

रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बहिणीला काय गिफ्ट द्यायचे याच्या टेन्शनमध्ये असाल तर आम्ही तुमची चिंता दूर करून रक्षाबंधनाच्या दिवशी तिला काय गिफ्ट देऊ शकता ते सांगतो.

Gift your sisters financial stability this Rakshabandhan, see 5 best financial gifts
Raksha Bandhan ला तुमच्या बहिणींना द्या लाईफलाॅंग गिफ्ट, पाहा 5 सर्वोत्तम आर्थिक स्थैर्याच्या भेटवस्तू ।   |  फोटो सौजन्य: BCCL

Rakshabandhan Gift : रक्षाबंधन अगदी जवळ आले आहे. त्याची नेमकी तारीख 11 ते 12 ऑगस्ट दरम्यान असण्याबाबत सध्या साशंकता व्यक्त होत असली तरी त्याची तयारी सुरू झाली आहे. राखीच्या दिवशी भाऊ त्यांच्या बहिणींना रोख रक्कम, गॅजेट्स, गिफ्ट व्हाउचर आणि इतर अनेक भेटवस्तू देतात. साहजिकच प्रेमाने दिलेल्या या सर्व भेटवस्तू अतिशय अप्रतिम आहेत. तथापि, या रक्षाबंधनाला तुम्ही एक पाऊल पुढे जाऊन तुमच्या बहिणींना आर्थिक स्थैर्य भेट देऊन भविष्यासाठी तयार करू शकता. आम्ही तुम्हाला अशा 5 आर्थिक भेटवस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या बहिणींना या रक्षाबंधनाला भेट देऊ शकता. (Gift your sisters financial stability this Rakshabandhan, see 5 best financial gifts)

 

अधिक वाचा : Rakshabandhan: भावासाठी राखी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात, भावा-बहिणीमध्ये वाढेल प्रेम


मुदत ठेव- तुम्ही तुमच्या बहिणीच्या नावाने मुदत ठेव (FD) सुरू करू शकता. हा जमा होणारा निधी भविष्यात त्यांच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य सुनिश्चित करेल.

स्टॉक्स- दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुम्ही तुमच्या बहिणींना मोठी कंपनी किंवा कंपन्यांचे स्टॉक भेट देऊ शकता. होय, जर तुम्हाला शेअर बाजाराची चांगली ओळख नसेल, तर शेअर खरेदी करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराशी नक्की बोला.

अधिक वाचा : Bhaubeej 2021 Shubh Muhurat: यंदा भाऊबीज दिवशी कोणत्या वेळेत कराल भावांची ओवाळणी; जाणून घ्या अत्यंत शुभ मुहूर्त!

म्युच्युअल फंड- तुम्ही तुमच्या बहिणीसाठी म्युच्युअल फंड सुरू करू शकता. तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये चांगले परतावा मिळतो आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्या बहिणीकडे चांगला आर्थिक निधी असू शकतो.
 

आरोग्य विमा- तुम्ही तुमच्या बहिणीला भविष्यातील आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी तिला विमा पॉलिसी भेट देऊ शकता.

अधिक वाचा : Raksha Bandhan 2021: या रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला द्या हे गिफ्ट, नक्की आवडेल 
डिजिटल गोल्ड- भारतीय घरांमध्ये सोने हे सहसा भेट म्हणून दिले जाते. पण यावेळी भौतिक सोने देण्याऐवजी तुम्ही बहिणींना डिजिटल सोने भेट देऊ शकता. महागाईचा सामना करण्यासाठी सोने हे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी