Boys looks: मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मुले अनेक प्रकारच्या युक्ती वापरतात. कोण दिसण्याला प्राधान्य देतं तर कोण महागड्या वस्तू, गॅझेट्स दाखवून मुलींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतं. मात्र, दिसण्यापेक्षा व्यक्तिमत्त्व फार महत्त्वाचे असते आणि हे कोणालाही नाकारता येणार नाही. पण स्त्री आणि पुरुष यांच्याबाबत आकर्षणाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर काह गोष्टी अशा आहेत ज्या महिलांना पुरुषांकडे आकर्षित करण्यास कारणीभूत ठरतात. (girls attract towards boys due to this look lifestyle news in marathi)
न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात असे समोर आले होते की, ट्रिम्ड बीयर्ड म्हणजेच थोडीशी दाढी असलेल्या पुरुषांकडे महिला आकर्षित होतात. या स्टडीचे लेखक जे डिक्सन आणि रॉबर्ट सी. ब्रूक्स यांच्यानुसार, "चेहऱ्यावरील केस हे मेच्यॉरिटी आणि मर्दानगी दाखवण्यासोबतच प्रभुत्त्व आणि आक्रमकताशी संबंधित आहे." त्यांनी म्हटलं की, अशी दाढी जी जास्त घनदाट अशी नको मात्र, हलकीशी असली तर अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात.
हे पण वाचा : गुळाचा एक तुकडा बदलेल तुमचं आयुष्य, केवळ करावा लागेल हा उपाय
2010 मध्ये आलेल्या एका स्टडीनुसार, बहुतेक महिला अशा पुरुषांना पसंत करतात जे खूपच यंग नाही तर प्रौढ दिसतात. तसेच ते खूपच मॅच्युअर असलेले पुरुषही महिलांना आवडतात. याच्यासोबतच एका स्टडीनुसार असे समोर आले की, ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात त्यांना असे पुरुष आवडतात जे वयाने मोठे आहेत आणि आपल्या आयुष्यात सेटल आहेत.
हे पण वाचा : या आहेत 2023 मधील लकी राशी, होईल पैशांचा वर्षाव
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील एका स्टडीनुसार असे समोर आले की, महिलांना असे पुरुष आवडतात जे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. मात्र, हेवी मसल्स असलेल्या पुरुषांसोबत त्या दीर्घकाळ संबंध ठेवू इच्छित नाहीत. तर असे पुरुष जे पूर्णपणे फिट आहेत आणि जास्त बॉडी सुद्धा नाहीये अशा पुरुषांना जोडीदार बनवण्यासही महिला प्राधान्य देतात.
हे पण वाचा : म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात
महिलांना आकर्षित करण्यासाठी पुरुष हे डीओ किंवा परफ्युमचा वापर करतात. 2009 मध्ये जनरल ऑफ कॉस्मेटिक सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका स्टडीनुसार, या संदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.
हे पण वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात
तसेच महिलांना असेही पुरुष आवडतात जे आपल्या लूक सोबतच स्वच्छतेचीही काळजी घेतात. म्हणजेच मुलांचे कपडे हे स्वच्छ आणि चांगले असावेत. घामाची दुर्गंधी येऊ नये यासाठी डीओ किंवा परफ्युम वापरत असावा. नखे स्वच्छ असावेत. शूज वापरणारा असावा.