Attractive Males: हे गुण असणारे तरुण सहज जिंकतात तरुणींची मनं, करा आत्मपरिक्षण!

अनेक तरुण तरुणींना आकर्षित कऱण्यासाठी प्रयत्नशील असतात. जाणून घेऊया नेमके कुठले गुण मुलींना अधिक आवडतात.

Attractive Males
हे गुण असणारे तरुण जिंकतात तरुणींची मनं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तरुणींना आवडतात खरं बोलणारे तरुण
  • भावना व्यक्त करणाऱ्या तरुणांवर भाळतात तरुणी
  • कुटुंब आणि मित्रांमध्ये रमणारे तरुण ठरतात आकर्षक

Girls find these qualities attractive in males: आपल्या आयुष्यात एक तरुणी (Girl) यावी आणि तिच्याशी आपलं घट्ट नातं (Relation) जुळावं, असं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. त्यासाठी आपल्याला आवडणाऱ्या तरुणीचं मन जिंकण्यासाठी तरुण अनेक प्रयत्न करत असतात. मात्र मुलींना काय आवडतं, याचं नेमकं आकलन अनेकांना नसतं. त्यामुळे केवळ जिममध्ये (Gym) जाऊन बॉडी बनवणे किंवा आपल्या लुक्सनी इंप्रेस करणे एवढाच विचार बहुतांश तरुण करतात. प्रत्यक्षात मात्र आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना मुली अनेक बाबींचा विचार करत असतात. जाणून घेऊया मुलींना कुठल्या प्रकारचे तरुण आवडतात.

१. सत्य बोलणारे तरुण

अनेक तरुण तरुणींशी वारंवार खोटं बोलण्याचा प्रयत्न करतात. मुलींना हे अजिबात आवडत नाही. जर तुम्ही बोलत असलेल्या खोटं मुलीच्या लक्षात आलं तर त्यानंतर ती तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत खोटं बोलू नका.

२. आदर देणारे तरुण

आदर हा प्रत्येक नात्याचा महत्त्वाचा आधार असतो. एकमेकांबाबत आदर नसेल, तर कुठलंही नातं मूळ धरू शकत नाही. जी मुलं सर्वांचा आदर करतात आणि प्रत्येकाशी आदराने बोलतात, ती मुलींना अधिक आवडतात. 

अधिक वाचा - Travel Tips : फक्त 50,000 रुपयांमध्ये करा या देशाचे पर्यटन, काय पाहायचे, कुठे राहायचे, काय खायचे

३. नेतृत्वगुण

रिसर्चनुसार नेतृत्वगुण असणारे तरुण तरुणींना अधिक आकर्षक वाटतात. अशा तरुणांमध्ये आत्मविश्वास जास्त असतो आणि आपल्या निर्णयावर ठाम राहून आपली स्वप्नं पूर्ण करण्याचं कसब अशा तरुणांमध्ये अधिक दिसतं. 

४ व्यक्त होणारे तरुण

आपल्या मनातील भावभावना शेअर करणारे तरुण तरुणींना अधिक आवडतात. कुठलंही नातं निकोप राहण्यासाठी शेअरिंग खूप महत्त्वाचं असतं. आपल्या मनातील भावना आपल्या पार्टनरकडे व्यक्त केल्या नाहीत, तर नात्यात गढूळपणा यायला सुरुवात होते.

अधिक वाचा - Secrets of youthfulness: कमी वयात उगाचच म्हातारे होऊ नका, चाळीशीपूर्वीच सोडा या सवयी!

५. फिटनेसची आवड

मुलींना प्रभावित करण्यासाठी जिममध्ये जाऊन तासन्‌तास घाम गाळण्याची गरज नसते. रोजच्या रोज व्यायाम करणारे, फिट राहणारे, योग्य आहार घेणारे आणि व्यसनांपासून लांब राहणारे तरुण तरुणींना जास्त आवडतात. 

६. नवं शिकण्याची वृत्ती

काही ना काही नवं शिकण्याची आवड असणारे तरुण तरुणींना जास्त आवडतात. कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य यापैकी कुठल्या ना कुठल्या क्षेत्राची आवड असणारे आणि नवं शोधण्याचा, शिकण्याचा प्रयत्न कऱणारे तरुण तरुणींना अधिक भावतात. 

७. चुकांचा स्विकार

आयुष्यात चुका प्रत्येकाकडूनच होत असतात. आपल्या चुकांपासून शिकणारे आणि त्यापूर्वी आपली चूक मान्य करणारे तरुण तरुणींना जास्त भावतात. जर तुम्ही तुमची चूक मान्य करत नसाल, तर वारंवार तुमची भांडणं होत राहतील आणि त्यातून नातं खराब होत राहिल. 

अधिक वाचा - Marriage Tips : बॉयफ्रेंड होण्यासाठी गुण नसले तरी पोरींना चालतं, पण पती होण्यासाठी मुली बघतात या गोष्टी

८. स्वतःकडे लक्ष देणे

आपल्याकडे लक्ष देऊन टापटिप राहणारे, स्वच्छता बाळगणारे तरुण तरुणींना आकर्षित करतात. ज्यांचा ड्रेसिंग सेन्स चांगला असेल, तर त्याचा फायदाच होतो. 

९. रोमॅँटिक तरुण

मुलींना वेळ देणारे, त्यांच्यासोबत लंच,डिनरला जाणारे रोमँटिक तरुण तरुणींना अधिक प्रिय असतात. 

१०. कुटुंबवत्सल तरुण

आपल्या मित्रमंडळींसोबत राहणारे, नातेवाईकांच्या संपर्कात असणारे तरुण तरुणींना अधिक आवडतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी