पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी लुटा मधुचंद्राचा आनंद; क्षण होतील यादगार

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jun 28, 2022 | 17:28 IST

काही दिवसात लग्नाचा हंगाम संपणार आहेत. यंदा 8 जुलैपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. जर तुम्हीही या हंगामात लगीनगाठ बांधली असेल आणि हनिमूनला जाण्याचा विचार करण्यात आला असाल तर पावसाळ्यात कोणत्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल, अशा रोमँटिक ठिकाणांची माहिती तुम्हाला देत आहोत. या ठिकाणांना भेट दिल्यास मधुचंद्राच्या आनंदात भर पडेल. चला, जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल-

go these romatic places for your honeymoon
पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी लुटा मधुचंद्राचा आनंद  |  फोटो सौजन्य: Indiatimes

मुंबई : काही दिवसात लग्नाचा हंगाम संपणार आहेत. यंदा 8 जुलैपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. जर तुम्हीही या हंगामात लगीनगाठ बांधली असेल आणि हनिमूनला जाण्याचा विचार करण्यात आला असाल तर पावसाळ्यात कोणत्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल, अशा रोमँटिक ठिकाणांची माहिती तुम्हाला देत आहोत. या ठिकाणांना भेट दिल्यास मधुचंद्राच्या आनंदात भर पडेल. चला, जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल-

केरळ (Kerala)-

केरळ हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. केरळमध्ये प्रत्येक हंगामात पर्यटक येतात. प्री वेडिंग शूट, हनिमून आणि बेबीमूनसाठी अनेक जोडपी केरळमध्ये येतात. जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात हनिमूनला जायचे असेल तर कोवलम हे योग्य ठिकाण आहे. कोवलममध्ये तुम्ही आयुर्वेदिक कपल्स स्पा चा आनंद घेऊ शकता. त्याच वेळी, बोटींगचा आनंदही घेऊ शकता. एकंदरीत कोवलम मधुचंद्रासाठी सर्वोत्तम आहे.

लडाख (Ladakh)-

लडाखचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. लडाखमध्ये फार कमी पाऊस पडतो. त्यामुळे हनिमून ट्रिपला त्रास होणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तंबूत मुक्काम करू शकता. याशिवाय लडाखमध्ये उंट सफारीचा आनंद लुटता येतो.

जयपूर, राजस्थान (Jaypur, Rajasthan)-

जयपूर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. जयपूरमध्ये पावसाळ्यात रिमझिम पावसात तुम्ही हनिमूनचा आनंद घेऊ शकता. या शहरात जगप्रसिद्ध इमारती, राजवाडे आहेत. जिथे तुम्ही तुमचं हनिमून अविस्मरणीय बनवू शकता.

गोवा (Goa)-

जर तुम्हाला समुद्रकिनारी हनिमून साजरं करायचा असेल तर गोवा हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. हनिमूनसाठी मोठ्या संख्येने जोडपी गोव्यात जातात. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात गर्दी कमी असते. पावसाळ्यात तुम्ही कमी बजेटमध्ये गोव्यात राहू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी