Laxmi coming Signals : ही सहा लक्षणं असतात लक्ष्मीच्या आगमनाची खूण, मिळतात भरभराटीचे संकेत

आपल्या घरी लक्ष्मी येणार असल्याची काही लक्षणं दिसतात. काही शारीरिक लक्षणं असतात तर काही संकेत स्वप्नात दिसतात.

Laxmi coming Signals
ही सहा लक्षणं असतात लक्ष्मीच्या आगमनाची खूण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लक्ष्मी येण्यापूर्वी मिळतात काही संकेत
  • उजवा तळहात खाजायला होते सुरुवात
  • स्वप्नात दिसतात काही विशिष्ट प्राणी

Laxmi Coming Signals : असं म्हणतात की लक्ष्मी देवता (Goddess Laxmi) ज्याच्यावर प्रसन्न होते, त्याला कधीच पैशांची (Money) आणि संपत्तीची (Property) वानवा भासत नाही. लक्ष्मीमातेला प्रसन्न करून घेण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय, मंत्रतंत्र आणि पूजाअर्चा करत असतात. मात्र अनेकांना हे सगळं करूनही लक्ष्मी प्रसन्न होतेच, असं नाही. काहीजणांच्या आयुष्यात मात्र यातील काहीही न करता अचानक संपत्ती यायला सुरुवात होते. त्यांचे सगळे प्लॅन यशस्वी होऊ लागतात आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने लक्ष्मीमाता प्रसन्न होऊ लागते. हे घडण्यापूर्वी लक्ष्मीमाता आपल्या आगमनाचे काही संकेत देते, असं मानलं जातं. हे संकेत वेळीच ओळखले, तर आपल्यावर लक्ष्मीमाता प्रसन्न होत असून लवकरच आपली भरभराट होणार असल्याचं लक्षात येऊ शकतं. जाणून घेऊया, अशाच काही लक्षणांविषयी. 

उजव्या हाताला खाज सुटणं

उजव्या हाताला जर वारंवार खाज सुटत असेल, तर हे लवकरच लक्ष्मी श्रीमंत होणार असल्याचं लक्षण मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार उजवा तळहात खाजणं हे कुठून ना कुठून धनलाभ होणार असल्याचं लक्षण मानलं जातं. त्याचप्रमाणं जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या कुठूनतरी शंखाचा आवाज ऐकू येणं, हेसुद्धा शुभ लक्षण मानलं जातं. जर तुम्ही सकाळी आवरून बाहेर पडलात आणि रस्त्यात तुम्हाला तोंडात शाकाहारी वस्तू धरलेला कुत्रा दिसला, तर तुमच्या आयुष्यात आर्थिक प्रगती सुरु होणार असल्याचं ते लक्षण समजलं जातं. कुत्र्याच्या तोंडातून शाकाहारी पदार्थ पाठवून लक्ष्मी आपल्या येण्याचा संकेत देत असल्याचं मानलं जातं. 

पक्ष्यांनी घरटं बनवणं

जर तुमच्या घरात कुठलाही पक्षी घरटं बनवत असेल, तर त्याला हुसकावून लावू नका. पक्ष्याने घरात घरटं करणं हे शुभ लक्षण मानलं जातं. जर पक्ष्याच्या घरट्यामुळे तुमच्या घरात घाण होते, असं तुम्हाला वाटत असेल, तर ते घरटं पाडून टाकण्याऐवजी उचलून शेजारच्या झाडावर लटकावून टाका. असं केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसू लागेल. 

अधिक वाचा - Today in History Thursday, 11th August 2022 : आज आहे क्रांतिकारक खुदीराम बोस यांचा स्मृतीदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

स्वप्नांवर ठेवा लक्ष

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात हत्ती, पाल, गुलाब, साप, घुबड, मुंगुस, शंख, तारा, माठ किंवा झाडू यापैकी काहीही दिसलं, तर ते शुभ लक्षण असल्याचं सांगितलं जातं. माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी विराजनमान होण्यासाठी येत असल्याचं हे लक्षण असतं. 

अधिक वाचा - Husband wife secret: आपल्या पत्नीला कधीच सांगू नका 'या' ३ गोष्टी, अन्यथा...

रोज कुणीतरी कचरा काढताना दिसणं

रस्त्याने जाताना रोज तुम्हाला कुणीतरी हातात झाडू घेऊन कचरा काढताना दिसत असेल, तर कुठल्या तरी जुन्या प्रकरणातून तुमची सुटका होणार असल्याचं ते लक्षण समजलं जातं. एखादं रखडलेलं न्यायालयीनं काम मार्गी लागू शकतं किंवा बऱ्याच दिवसांपासून अडकून पडलेला पैसा तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही अचानक श्रीमंत होणार असल्याचंही हे लक्षण मानलं जातं. 

घरात काळ्या मुंग्या

घरात अचानक काळ्या मुंग्यांची रांग दिसणं, हेसुद्धा श्रीमंती येणार असल्याचं लक्षण मानलं जातं. कुठूनतरी तुमच्या घरी संपत्ती येणार असल्याचं हे लक्षण असतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी