Gondavalekar Maharaj punyatithi: श्री गोंदवलेकर महाराज यांची रविवार (18 डिसेंबर 2022) पुण्यतिथी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे होऊन गेलेल्या संतांच्या मांदियाळीत शोभून दिसतील अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्ह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. महाराजांच्या घराण्यात पंढरीची भक्ती आणि वारी सात पिढ्या चालत आलेली होती. महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊयात त्यांचा जीवनपट आणि इतर माहिती. (Gonavalekar maharaj death anniversary punyatithi 2022 pravachan kirtan photos samadhi maharaj website shrigondavalekarmaharaj org)
गोंदवले महाराजांच्या समाधीचं दर्शन तुम्ही shrigondavalekarmaharaj.org या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.
श्री महाराजांना अन्नदान, गोरक्षण, नामस्मरण या तीन गोष्टी आवडत असत. त्यामुळे गोंदवले येथे समाधीसन्निध सद्गुरू आहेतच. या भावनेने अखंड नाम चालू ठेवले पाहिजे हा सर्वांचा आग्रह आहे. 1942 मध्ये तेरा कोटी रामनाम जपसंकल्प सोडण्यात आला होता. 1962-63 मध्ये मंदिरात तेरा कोटी जप संकल्प करण्यात आला. 50व्या पुण्यतिथी उथ्सवात 50 कोटी जप पूर्ण झाला. 1963 च्या डिसेंबर महिन्यात सुवर्ण महोत्सवाच्यावेळी या जपाची सांगता करण्यात आली.
हे पण वाचा : Marathi Motivational Status: या प्रेरणादायी विचारांनी करा दिवसाची सुरुवात, आयुष्यात होईल भरभराट
अन्नदान हे असे दान आहे ज्यात दाता आणि भोक्ता दोघेही संतुष्ट होतात. अन्न दानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही. ते नित्य वाढत असते. योग्य मार्गाने मिळविलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग दानधर्माच्या कार्यासाठी उपयोगात आणावा.
गोंदवले येथे पुण्यतिथी महोत्सवास फार मोठ्या प्रमाणावर मंडळी येतात. दहा दिवस राहतात. स्वत:च्या उद्धाराकरिता समाधीसन्निध नाम घेतात, इतर सेवा करतात. या दहा दिवसांच्या काळात अखंड भजन, प्रवचन, कीर्तन, शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होतात.
हे पण वाचा : Yearly Horoscope 2023: मेष राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल नवे वर्ष, वाचा
(वरील माहिती shrigondavalekarmaharaj.org या संकेतस्थळावरुन घेण्यात आली आहे.)