Gonavalekar maharaj death anniversary punyatithi 2022 messages: श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची 109 वी पुण्यतिथी 18 डिसेंबर 2022 रोजी आहे. गोंदवले महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी समाधी मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करुन अभिवादन करतात. गोंदवले येथे पुण्यतिथी महोत्सवात दहा दिवस राहतात. यावेळी नागरिक स्वत:च्या उद्धारासाठी समाधीसन्निध नाम घेतात, इतर वेळ पडेल ती सेवा सुद्धा करतात. या दहा दिवसांच्या काळात मंदिरात अखंड भजन, प्रवचन, कीर्तन, शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम सुद्धा होतात. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे भाविक सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा महाराजांच्या स्मृतीस उजाळा देतात. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे संदेश पाठवून तुम्ही महाराजांच्या स्मृतीस उजाळा देऊ शकतात. (Gonavalekar maharaj punyatithi abhivadan banner messages images facebook post whatsapp message in marathi)
(Photo Courtesy: Twitter)
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाची मुहूर्त मेढ मार्गशीर्ष शुद्धप्रतिपदेला रोवली जाते. महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून दशमीपर्यंत साजरा केला जातो.
(Photo Courtesy: Twitter)
मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेस काकड आरती होते आणि त्यानंतर कोठीपूजनाचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाची सुरुवात सनईवादनाने होते.
(Photo Courtesy: Twitter)
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेल्यानुसार, त्यांनी दिलेल्या 'अक्षय पिशवी'ची आणि चांदीच्या रुपयाची प्रथम पूजा करतात. पुण्यतिथी उत्सवात दहा दिवस दररोज सकाळी काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होते. रात्री 11 वाजता कीर्तन होऊन दिवसाची सांगता होते.
(Photo Courtesy: Twitter)
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. रोज सकाळी 9.30 वाजल्यानंतर महापूजेला सुरुवात होते. श्रींच्या पादुकांवर अभिषेक होतो.
(Photo Courtesy: Twitter)
गोंदवले येथे पुण्यतिथी महोत्सवास फार मोठ्या प्रमाणावर मंडळी येतात. दहा दिवस राहतात. स्वत:च्या उद्धाराकरिता समाधीसन्निध नाम घेतात, इतर सेवा करतात. या दहा दिवसांच्या काळात अखंड भजन, प्रवचन, कीर्तन, शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होतात.
(Photo Courtesy: Twitter)
(Photo Courtesy: shrigondavalekarmaharaj.org)
(वरील माहिती shrigondavalekarmaharaj.org या संकेतस्थळावरुन घेण्यात आली आहे.)