Good Friday 2022 Images: गुड फ्रायडे निमित्त मराठमोळे HD Greetings, Wallpapers शेअर करा

Good Friday 2022 Images ख्रिश्चन धर्मातील मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्तांना क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिश्चन जगतात आजचा गुड फ्रायडेचा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो.

good friday 2022 hd images messages whatsapp status to remember lord jesus on the day he gave his life for the forgiveness of sins of the world
Good Friday 2022 Images: गुड फ्रायडे निमित्त Wallpapers   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ख्रिश्चन धर्मातील मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्तांना क्रॉसवर चढवण्यात आले.
  • याची आठवण ठेवून ख्रिश्चन जगात आजचा गुड फ्रायडेचा दिवस शोकदिन म्हणून पाळला जातो.
  • काही ख्रिश्चन पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे मानला जातो.

Good Friday Images: ख्रिश्चन धर्मातील मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्तांना क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिश्चन जगात आजचा गुड फ्रायडेचा दिवस शोकदिन म्हणून पाळला जातो. काही ख्रिश्चन पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे मानला जातो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. तसेच ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जाऊन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. हा दिवस केवळ येशूंच्या दिलेल्या उपदेशाची आठवण करण्यासोबत  स्मरण करण्यासोबत ते आचरणात आणण्यासाठी प्रेरित करणारा आहे.

आजपासून दोन हजार वर्षांपूर्वी जेरुसलेममधील गॅलिली प्रांतात तरुण येशू लोकांना मानवता, बंधूभाव, एकता आणि शांतीचा संदेश देत होते. ज्यामुळे लोकांनी त्यांना ईश्वरी अवतार मानण्यास सुरुवात झाली. त्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवून त्याचा फायदा घेणार्‍या धर्मगुरुंचा तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी येशूंना मानवतेचा शत्रू आहे, असे म्‍हणण्यास सुरुवात केली. परंतु, तरीही त्यांची लोकप्रियता वाढतच राहिली. येशूंची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता धर्मगुरुंच्या डोळ्यात खूपत होती. त्यामुळे त्यांनी रोमचा शासक पिलातूस याचे कान भरण्यास सुरुवात केली. 

स्‍वत:ला ईश्वराचा पूत्र मानणारा हा युवक पापी आहे. त्याने धर्माचा अवमान केला आहे, म्‍हणून येशूंवर राजद्रोहाचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर त्यांना फटके मारण्यात आले. काट्यांचा मुकूट घालण्यात आला. हाल-हाल करून त्यांना सुळावर चढविले.

Good Friday 2022 HD Images

Good Friday 2022 HD Images 1

Good Friday 2022 HD Images 2

Good Friday 2022 HD Images 3

Good Friday 2022 HD Images 4


क्रूर लोकांनी एकत्र येऊन येशूंना यातना दिल्या आणि त्यांना सूळावर चढविले. तेव्‍हाही प्रभू येशूंच्या मुखातून क्षमा आणि कल्याणाचे उद्गार बाहेर पडले. हा त्यांच्या क्षमाशील तत्‍वांचा आदर्श मानला जातो. "हे प्रभू यांना माफ कर. कारण यांना माहीत नाही की ते काय करत आहेत.." असे शेवटचे वाक्य येशूंच्या मुखातून निघाले तेच येशूंचे अंतिम वचन असल्याचे मानले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी