Good Friday 2023 Quotes: गुड फ्रायडे निमित्त येशूच्या विचारांचे Inspirational Messages, Images!

Good Friday 2023 Quotes : ख्रिश्चन धर्मात काही जण गुड फ्रायडे दिवशी दुपारी बरोबर 3 वाजता प्रार्थना करतात. त्यांच्या मते प्रभू  येशूला यावेळी सूळावर चढविण्यात आले आणि निधनाची हीच वेळ होती. त्यामुळे गुड फ्रायडे हा दिवस साजरा करत नाही.  यावेळी मौन ठेवून हा दिवस पाळला जातो.

good friday 2023 quotes messages of jesus christ to honors his sacrifice read in marathi
गुड फ्रायडेचे येशूच्या विचारांचे Inspirational Messages 
थोडं पण कामाचं
  • जगभरात ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडे (Good Friday) हा दिवस येशू ख्रिस्तांचा बलिदान दिवस म्हणून पाळतात
  • धार्मिक धारणांनुसार गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त (Jesus Christ) यांना वधस्तंभावर म्हणजे सूळावर लटकवले होते हा दिवस त्यांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ पाळला जातो.
  • यंदा जगभरात 7  एप्रिल हा दिवस गुड फ्रायडे आहे.

Good Friday 2023 Quotes: जगभरात ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडे (Good Friday) हा दिवस येशू ख्रिस्तांचा बलिदान दिवस म्हणून पाळतात. त्यांच्या धार्मिक धारणांनुसार गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त (Jesus Christ) यांना वधस्तंभावर म्हणजे सूळावर लटकवले होते.  हा दिवस त्यांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ पाळला जातो. यंदा जगभरात 7 एप्रिल हा दिवस गुड फ्रायडे आहे. Maundy Thursday नंतरचा शुक्रवार हा गुड फ्रायडे असतो. तर या गुड फ्रायडे नंतर येणारा रविवार हा ईस्टर संडे (Easter Sunday) म्हणून साजरा केला जातो.

ख्रिस्ती धर्मात, येशू ख्रिस्ताचा मृत्यू हा पवित्र ग्रंथ बायबल मधील उल्लेख केलेला सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की मृत्यूने त्याने मानवजातीची सर्व पापे काढून घेतली आणि त्याच्या सुळामुळे त्यांचे तारण झाले. मग यंदाच्या या गुड फ्रायडे दिवशी येशूच्या त्या बलिदानच्या दिवसाचं स्मरण करताना त्याने दिलेल्या काही संदेशांची, विचारांची देखील सोशल मीडियात WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देवाण घेवाण करूया. यंदा गुड फ्रायडे दिवशी तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबतही हे विचार शेअर करायला विसरू नका.

गुड फ्रायडे निमित्त Quotes

Good Friday 2022 Quotes

Good Friday 2022 Quotes 1

Good Friday 2022 Quotes 2

Good Friday 2022 Quotes 3


गुड फ्रायडे च्या दिवशी चर्च मध्ये सामुहिक प्रार्थनेचे आयोजन केले जाते. बर्‍याच चर्चमध्ये क्रॉस स्टेशनचे क्रॉस असतात. काही लोक दुपारच्या वेळी जवळच्या लोकांसोबत एकत्र येतात. यावेळी आपल्या साथीदारांसोबत चहा-बन खातात. काही लोक या दिवशी उपवास करतात, खाणे टाळतात. काही जण दुपारी बरोबर 3 वाजता प्रार्थना करतात. त्यांच्या मते येशूच्या निधनाची हीच वेळ होती. त्यामुळे गुड फ्रायडे हा दिवस सेलिब्रेशनचा नसून मौन बाळगत पाळला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी