Gudi padwa 2021: गुढीपाडव्याला कडुनिंबाची कोवळी पाने का खातात? काय आहे कडुनिंबाचे महत्व

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Apr 12, 2021 | 11:44 IST

हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. पुराणांप्रमाणे ब्रम्हदेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले आहे.

Why does Gudipadva eat neem leaves? What is the importance of neem
गुढीपाडव्याला कडुनिंबाची कोवळी पाने का खातात?  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • कडुनिंबाच्या पानांचे सेवन केल्यास शरिराला मिळते ऊर्जा
  • कडुनिंबामुळे त्वचेसंबंधी तक्रारी होतात दूर
  • फक्त दोन महिने कडुनिंबाची पाने सेवन केले तरी वर्षभर लाभ

मुंबई : हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. पुराणांप्रमाणे ब्रम्हदेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले आहे. तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो, हे आपल्याला माहिती आहे. या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. का म्हणून कडुनिंबाची कोवळी पाने खाल्ली जातात. काय असतं महत्त्व याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.. (Why does Gudi padva eat neem leaves)

काय आहे महत्त्व

या दिवशी कडुनिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजवलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ इत्यादी मिसळून चटणी तयार केली जाते. याचे सेवन केल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात. शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते. म्हणून केवळ या दिवशी कडुनिंबाचे सेवन करायचे असे नसून या दिवसापासून वर्षभर याची आठवण राहावी हे सुचविले आहेत.

आरोग्यदायी कडुनिंब

 

कडुनिंबाची पाने, फुले, फळे, मुळे आणि खोड अशा पाच अंगांचा उपयोग होतो. पाने कडू लागते असली तरी आपल्या गुणांमुळे गुढीपाडव्याच्या दिवशी याचे सेवन केले जाते. याने पोटातील जंत दूर होण्यास मदत मिळते. कडुनिंबाने अंगावर उठणारी खाज व इतर त्वचेसंबंधी तक्रारी दूर होतात. तसेच वर्षभर कडुनिंब खाणे शक्य नसल्यास केवळ गुडीपाडव्यापासून दोन महिनेही याचे नियमित सेवन केले तरी वर्षभर याचा लाभ होतो. एकूण आरोग्याच्या दृष्टीने कडुनिंबाचे सेवन करणे योग्यच आहे. याने रोगराई दूर होते आणि शरीर निरोगी राहतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी