Happy Gudi Padwa 2022 Wishes in Marathi: चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 'गुढीपाडवा'. हिंदू आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे ही नववर्षांची सुरूवात असते. म्हणूनच हिंदू सणांपैकी गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाला विशेष महत्व आहे. या सणादिवशी आपल्या घराबाहेर कलश, बत्ताशे, कडुलिंबाची पाने लावून गुढी उभारली जाते आणि पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी दाराबाहेर छान रांगोळी काढून, दिव्यांची आरास करून, घरात गोडाधोडाचे बनवून मराठी माणसं नववर्षाचे अगदी जल्लोषात स्वागत करतात. तसेच या दिवशी रस्त्यावर शोभायात्रा देखील काढल्या जातात.
गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. तरीही अनेकांनी सोशल मीडियाद्वारे एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यंदाही उन्हाचा तडाखा अधिक असल्याने प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे शक्य नसेत तर चिंता नको. तुमच्यासाठी खास गुढीपाडव्याचे खास मराठमोळ्या शुभेच्छा संदेश घेऊ आलो आहोत.
गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
कलश, बत्ताश्यांनी सजवा गुढी
कायम जतन करा आपल्या परंपरा आणि रुढी
एकमेकांबद्दल मनात ठेवू नका कुठलीही अढी
नववर्षाच्या स्वागतासाठी उंचच उंच उभारूया ही गुढी
गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आला सण गुढीपाडव्याचा
नाती, परंपरा जपण्याचा
दु:ख सारे विसरूया
नववर्ष साजरे करुया
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
राग-रुसवे विसरून वाढवा नात्यातला गोडवा
एकत्र येऊन साजरा करुया सण गुढीपाडवा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष तुम्हांस व तुमच्या कुटूंबियांस सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो
गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
गुढी उभारूया नववर्षाची
नव्या आयुष्याची,
सुख समृद्धीची
चांगल्या आरोग्याची,
उज्ज्वल भविष्याची
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडवा भारतामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा चैत्र महिन्याची आणि हिंदू नववर्षाची सुरुवात करतो. त्यामुळे हा सण साजरा करण्याचा उत्साहच काही निराळाच असतो.