Gudi Padwa Special Puran Poli Recipe : गुढीपाडव्यासाठी अस्सल मराठी पाककृती

लाइफफंडा
Updated Mar 21, 2023 | 23:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gudi Padwa 2023 Special Recipes :  हा वर्षाचा तो काळ असतो, जेव्हा सणाचा उत्साह सर्वत्र जाणवतो. उजळलेल्या रस्त्यांपासून ते सजवलेल्या घरांपर्यंत भव्य पारंपारिक पदार्थांच्या मनमोहक सुगंधापर्यंत वसंत ऋतु केवळ हवामान आणि फुलांच्या बाबतीत आनंदच देत नाही तर उत्सवाच्या उत्साहाने देखील भरतो. 

Gudi Padwa : Authentic Marathi Recipe for Gudi Padwa
 हा वर्षाचा तो काळ असतो, जेव्हा सणाचा उत्साह सर्वत्र जाणवतो  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  •  हा वर्षाचा तो काळ असतो, जेव्हा सणाचा उत्साह सर्वत्र जाणवतो
  • गुढीपाडव्यासाठी सगळ्यांच्या घरी श्रीखंड पुरीचा बेत हा ठरलेलाच असतो
  • पुरणपोळी ही सगळ्यांचाच आवडीची आहे.

Gudi Padwa  2023 Special Recipe in marathi:  हा वर्षाचा तो काळ असतो, जेव्हा सणाचा उत्साह सर्वत्र जाणवतो. उजळलेल्या रस्त्यांपासून ते सजवलेल्या घरांपर्यंत भव्य पारंपारिक पदार्थांच्या मनमोहक सुगंधापर्यंत वसंत ऋतु केवळ हवामान आणि फुलांच्या बाबतीत आनंदच देत नाही तर उत्सवाच्या उत्साहाने देखील भरतो. 

पुरणपोळी हा महाराष्ट्रात मिळणारा सर्वात स्वा दिष्ट, गोड पदार्थांपैकी एक आहे. गूळ आणि चणाडाळ पासून बनवली जाते. पुरणपोळी ही सगळ्यांचाच आवडीची आहे. 

अधिक वाचा :गुढी पाडवा : सणासुदीला नेसू शकता या साड्या

दह्यापासून श्रीखंड बनवले जाते. गुढीपाडव्यासाठी सगळ्यांच्या घरी श्रीखंड पुरीचा बेत हा ठरलेलाच असतो. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी दह्यापासून श्रीखंड बनवू शकता.

शाकाहारी स्नॅक्सचा विचार केल्यास, कुरकुरीत साबुदाणा वडा हा तयार करण्यासाठी सर्वात सोपा स्नॅक्सच नाही तर सर्वात स्वादिष्ट देखील आहे. तुम्हाला फक्त काही साबुदाण्यांची गरज आहे जी बटाट्यांसोबत मिक्स करुन  त्यात तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकून तेलात किंवा तुपात तळू शकता.

काजू मोदक सुद्धा तुम्ही या गुढीपाडव्याला बनवू शकता. काजू मोदक हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे ज्याचा आस्वाद महाराष्ट्रातील विविध सणांमध्ये, विशेषत: गणेश चतुर्थी आणि गुढीपाडव्याला घेतला जातो. आंबा, चॉकलेट आणि अगदी नारळ यांसारख्या विविध घटकांचा वापर करून हे तयार केले जाऊ शकते.

अधिक वाचा :राणी मुखर्जी वयाच्या ४४ व्या वर्षीही आहे फिट, बघा जिम रूटीन

आणखी एक पदार्थ मह्णजे कोथिंबीर वडी. कोथिंबीर बारीक चिरुन त्यात बेसन मसाले टाकून ते शिजवून घ्यायचे आणि त्याचे तुकडे करून तेलात कुरकुरीत तळून घ्या.

महाराष्ट्राकडे असे स्वादिष्ट अन्न आहे. बटाटा वडा हा एक स्वादिष्ट पदार्थ. बटाटा वडा हा सगळ्यांचाच आवडीचा. उकडलेल्या बटाट्यात मसाल्यांची फोडनी देऊन त्याला बेसनात घोळवून तेलात तळून घ्या आणि गरमगरम खायला तयार. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी