Gudi Padwa rangoli design 2023 : मराठी नववर्ष गुढी पाडवा साजरा करण्यासाठी घराच्या दारासमोर काढा ही आकर्षक रांगोळी, बघा व्हिडीओ

Gudi Padwa rangoli design video 2023 : आम्ही आपल्याला गुढी पाडव्या निमित्त काढायच्या आकर्षक रांगोळीचे निवडक व्हिडीओ शेअर करत आहोत.

Gudi Padwa, Gudhi Padwa
मराठी नववर्ष गुढी पाडवा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मराठी नववर्ष गुढी पाडवा
  • गुढी पाडवा साजरा करण्यासाठी दारापुढे काढा आकर्षक रांगोळी
  • बघा व्हिडीओ

Gudi Padwa rangoli design video 2023 : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढी पाडवा हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्राबाहेर जिथे मराठी नागरिक राहतात तिथे पण गुढी पाडवा साजरा होतो. यंदा बुधवार 22 मार्च 2023 रोजी गुढी पाडवा आहे. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी नव्या कामाचा शुभारंभ करणे, नवा व्यवसाय सुरू करणे, मोठी खरेदी करणे याला महत्त्व आहे. अनेकजण घर, व्यावसायिक जागा, वाहन, सोनं किंवा इतर मौल्यवान खरेदी गुढी पाडव्याच्या दिवशी करणे याला प्राधान्य देतात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असते. 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढी उभारली जाते. एका उंच काठीला रेशमी कापड (रेशमी खण) बांधतात. त्यावर चांदीचा गडू किंवा तांब्या उपडा घालतात. कडुनिंबाची डहाळी आणि  आंब्याची पाने त्यावर बांधतात. साखरेची गाठी आणि फुलांचा हार गुढीला चढवतात. घराच्या दारात अथवा खिडकीत उंच ठिकाणी गुढी उभारतात आणि रांगोळी काढत असतात. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. गुढी पाडव्या निमित्त घराच्या दारात आकर्षक रांगोळी काढली जाते. ही बाब लक्षात ठेवून आम्ही आपल्याला गुढी पाडव्या निमित्त काढायच्या आकर्षक रांगोळीचे निवडक व्हिडीओ शेअर करत आहोत.

Gudi Padwa : गुढीपाडव्यासाठी अस्सल मराठी पाककृती

बघा व्हिडीओ (Watch Gudi Padwa Video or Watch Gudhi Padwa Video)

गुढी पाडवा स्पेशल ठिपक्यांची रांगोळी

अनोखी गुढी पाडवा रांगोळी

गुढी पाडवा : आकर्षक रांगोळी

सोपी गुढी पाडवा रांगोळी

पळीच्या मदतीने काढा गुढीची रांगोळी

गुढी पाडवा रांगोळी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी