Habits of Successful People : यशस्वी माणसांना ‘या’ सवयी अजिबात नसतात, तुम्हाला असतील तर आत्ताच सोडा

सामान्य माणसे आणि यशस्वी माणसे यांच्या वागण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धतीत काही मूलभूत फरक असतात.

Habits of Successful People
यशस्वी माणसांना ‘या’ सवयी अजिबात नसतात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • यशस्वी माणसं वेगळा विचार करतात
  • पश्चात्ताप करत बसत नाहीत
  • चुकांपासून घेतात धडे

Habits of Successful People : आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्याची (Successful) आणि सर्वोच्च स्थानी पोहोचण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मात्र त्यासाठी आवश्यक असणारे गुण (Qualities) प्रत्येकामध्येच असतात असं नाही. यशस्वी होणाऱ्या माणसांमध्ये इतरांपेक्षा फार काही वेगळेपणा (Difference) असतोच असं नाही. मात्र काही सवयींपासून ते कटाक्षानं दूर राहतात. त्यामुळेच त्यांचा यशापर्यंतचा मार्ग सुकर होतो. काही सवयी अशा असतात ज्या आपली प्रगती रोखून धरतात आणि यशाचा वेग कमी करतात. अशा सवयी वेळीच ओळखून त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्याची गरज असते. यशस्वी माणसांमध्ये कुठल्या सवयी (Habits) असतात आणि कुठल्या सवयी अजिबात नसतात, हे जाणून घेऊया. 

पश्चात्ताप करण्यात वेळ वाया घालवत नाहीत

यशस्वी माणसं ही पश्चात्ताप करत बसत नाहीत. जरी एखाद्या गोष्टीमुळे त्यांचं नुकसान झालं तरी त्याची कारणं समजून घेऊन ते पुढं जातात. पश्चात्ताप करत बसण्याच्या सवयीमुळे आयुष्यातील बराचसा वेळ वाया जातो आणि होणारी प्रगतीदेखील थांबते. त्यामुळे यशस्वी व्यक्ती पश्चात्ताप करण्यात वेळ वाया घालवत नाहीत. 

बदलांना घाबरत नाहीत

बदल हीच आयुष्यातील कायमस्वरुपी टिकणारी गोष्ट आहे, हे यशस्वी माणसांना पटलेलं असतं. त्यामुळे कुठल्याही बदलाला ते नकार देत नाहीत. अयशस्वी माणसं ही नेहमी बदलाला नकार देतात. कामातील बदल, जागेतील बदल किंवा कुठल्याही इतर गोष्टीतील बदल त्यांना नकोसा वाटत असतो. मात्र सतत बदलत राहण्याच्या आणि नव्या गोष्टी शिकत राहण्याच्या वृत्तीमुळे माणसे यशस्वी होत असतात. 

अधिक वाचा - Laxmi coming Signals : ही सहा लक्षणं असतात लक्ष्मीच्या आगमनाची खूण, मिळतात भरभराटीचे संकेत

प्रत्येकाला खूश करणं शक्य नाही

यशस्वी माणसं प्रत्येकाला खूष करण्याचा प्रयत्न करत बसत नाहीत. कारण ते प्रॅक्टिकली शक्य नसल्याचं त्यांना व्यवस्थित माहित असतं. त्यामुळे कोण खुष होईल आणि कोण नाराज होईल, याचा विचार न करता, जे योग्य आहे ती गोष्ट ते करत राहतात. त्यामुळे त्यांची वेगाने प्रगती होते आणि मानसिक कारणांत ते अडकून पडत नाहीत. 

एक चूक वारंवार करत नाहीत

यशस्वी माणसं चुका करतात, मात्र एकदा केलेली चूक ते वारंवार करत नाहीत. एकदा केलेल्या चुकीतून ते शिकतात आणि भविष्यात ती चूक न करण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणं आपल्या चुकीची ते स्वतः जबाबदारी घेतात. 

अधिक वाचा - Today in History Thursday, 11th August 2022 : आज आहे क्रांतिकारक खुदीराम बोस यांचा स्मृतीदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

अनावश्यक विचार करत नाहीत

ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही, त्या गोष्टींवर फोकस करण्याचा ते कधीही प्रयत्न करत नाहीत. हे लोक नेहमी आपल्या कामावर फोकस करतात. कामातून होणाऱ्या परिणामांवर किंवा त्याच्या यशापयशावर ते विचार करत बसत नाहीत. जो काही परिणाम असेल, तो स्विकारतात आणि पुढील वाटचाल सुरू ठेवतात. 

यशस्वी माणसांमधील हे गुण सर्वांनी शिकण्यासारखे आणि विचार करण्यासारखे असतात. याच सवयी सर्वांनी अंगी बाणवल्या, तर प्रगतीचा वेग वाढायला नक्कीच मदत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी