Hacks for Clean and Whiten nail : नखं स्वच्छ आणि पांढरी ठेवण्यासाठी वापरा हे 5 हॅक्स

लाइफफंडा
Updated Nov 25, 2022 | 14:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hacks for Clean and Whiten nail : नखं स्वच्छ आणि पांढरी दिसणं, (Hacks for nail ) नखांचं सौंदर्य हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं (clean nail) मात्र, दैनंदिन जीवनात नखांची आणि बोटांची म्हणावी तशी काळजी आपण घेत नाही. त्यामुळे नखांची त्वचा कोरडी पडते, आणि नखं घाणेरडी होतात.

 Hacks for clean and whiten nail tips
नखांच्या सौंदर्यासाठी वापरा 5 हॅक्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नखांच्या सौंदर्यासाठी वापरा 5 हॅक्स
  • नखांसाठी बेकिंग सोडा, लिंबाचा रस, सल्फेट फ्री सोप वापरा
  • नखांचं सौंदर्य टिकून राहण्यासाठी त्यांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे

Hacks for Clean and Whiten nail : नखं स्वच्छ आणि पांढरी दिसणं, (Hacks for nail ) नखांचं सौंदर्य हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं (clean nail) मात्र, दैनंदिन जीवनात नखांची आणि बोटांची म्हणावी तशी काळजी आपण घेत नाही. त्यामुळे नखांची त्वचा कोरडी पडते, आणि नखं घाणेरडी होतात. (Hacks for clean and whiten nail tips)

नखं नैसर्गिकरित्या पांढरी करण्यासाठी तुम्हाला थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी हे 5 हॅक्स नखं साफ करण्यासाठी, पांढरी दिसण्यासाठी वापरा. यामुळे तुमची नखं नैसर्गिकरित्या पांढरी तर होतीलच शिवाय स्वच्छही दिसतील आणि नखं चमकतीलही. 

अधिक वाचा : मुलांना चुकूनही देऊ नका हे पदार्थ

1. बेकिंग सोडा

Don't have baking soda? Use these 6 substitutes that show better results! | The Times of India

बेकिंग सोडा ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो. बेकिंग सोडा नखं पाढरी करण्याचं काम करतो. 
दोन चमचे बेकिंग सोडा घ्या आणि कोमट पाण्यात मिसळा आणि नखांच्या खाली लावा. 
पाच-दहा मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर वापरायला विसरू नका.


2. लिंबाचा रस

Squeeze the health benefits of a lemon - Times of India

लिंबाच्या रसाच्या फायद्यांबद्दल तुम्हाला सर्वच माहिती आहे. लिंबाचा रस तुमच्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत करत नाही तर तुमची नखंही सुंदर दिसण्यास मदत करतो. 
कोमट पाण्याने धुण्यापूर्वी आपली नखे लिंबाच्या रसामध्ये काही मिनिटे बुडवून ठेवा. 

अधिक वाचा : व्हिटॅमिन डीसाठी सूर्यप्रकाश किती वाजता आणि किती वेळ घ्यावा

3. सल्फेट फ्री सोप

सौम्य साबणाने रोज नखं धुतल्याने तुमची नखं पांढरी दिसू शकतात. साबण कोणताही असला तरी चालेल मात्र तो सौम्य असावा. सल्फेट फ्री साबण वापरावा
त्यामुळे नखं पांढरी आणि स्वच्छ दिसू शकतात. 

4. टूथपेस्ट

What are the things one should check in their toothpaste - Dos and Don'ts | The Times of India

नखांच्या खाली टूथपेस्ट सुमारे पाच मिनिटे लावून ठेवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. टूथपेस्ट लावताना, नखातील घाण साफ करण्यासाठी तुम्ही वेगळा टूथब्रशचा वापर करा. 

 

अधिक वाचा :  शरीरात साठलेली घाण वेळीच करा साफ

5. व्हाइट व्हिनेगर

पाणी घालून पातळ केलेल्या पांढऱ्या व्हिनेगरच्या कपात नखं बुडवल्याने काही वेळातच ती साफ होतात. पाच मिनिटे नखं बुडवून ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. त्यानंतर ते मऊ आणि लवचिक ठेवण्यासाठी मॉईश्चरायझरचा वापर करा. या सर्व टिप्सचा नियमितपणे उपयोग केल्यास नखांची त्वचा, नखं सहज पांढरी होतील. नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने नखांचे सौंदर्य टिकवून ठेवा. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी