हळद हा एक असा मसाला आहे जो केवळ खाण्यासाठीच नव्हे तर सौंदर्य वाढविण्यासाठी देखील वापरला जातो. हळदीत अॅन्टिसेप्टिक आणि अॅन्टिबॅक्टिरिअल गुण असतात. जे शरीरातील जखम भरण्याचं काम करते. हळद स्किनचा देखील समस्या दूर करण्यासाठी ओळखली जाते.
तुम्ही हे हेअर मास्क केस चमकदार आणि मजबूत करण्यासाठी लावू शकता. घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींसोबत आपणं हळदीचा वापर करू शकतो. मग त्या गोष्टींमध्ये दही किंवा अंड्याचा समावेशही असू शकतो. तुम्हांला केसांसाठी बाजारात येणाऱ्या वस्तूंवर पैसे खर्च करायचे नसल्यास घरी हळदीनं बनविलेले हेअर मास्क वापरून पाहा.
एका भांड्यात हळद आणि तितकंच ऑलिव्ह ऑईल एकत्रित करून स्मूथ पेस्ट बनवा. ही पेस्ट संपूर्ण केसांना लावा आणि 30 मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूनं धुवा.
केसांसाठी पेस्ट बनवायची असेल तर 2 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा मध आणि थोडंसं दूध एकत्र करा. या पेस्टनं संपूर्ण केसांमध्ये मसाज करा. 20 मिनिटांनंतर केस शॅम्पूनं धुवा. यामुळे कोरड्या केस चमकदार आणि मजबूत होतात.
4 चमचा हळदीत दही एकत्रित करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण केसांना लावा. जेव्हा ही पेस्ट सुकेल त्यानंतर गरम पाण्यानं आणि माइल्ड शॅम्पूनं केस धुवा. तसंच कंडिशनर लावा.
2 चमचा हळद आणि 1 अंड्याचा पिवळा भाग घेऊन पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांच्या मुळापासून संपूर्ण केसांना लावा आणि सुकण्यासाठी सोडून द्या. त्यानंतर केस शॅम्पू आणि पाण्यानं धुवून टाका. या पेस्टमध्ये केस मजबूत होतील. केस शाइन आणि स्मूथ होतात.
केस मजबूत करण्यासाठी 1 चमचा हळदीसोबत हिना आणि थोडंसं दही एकत्रित करा. या पेस्ट केसांना लावा आणि सुकण्यासाठी सोडून द्या. पेस्ट सुकल्यानंतर शॅम्पूनं केस धुवा. असं आठवड्यात दोन वेळा करा.