Basweshwar Jayanti 2022: बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा द्या Facebook Messages, WhatsApp Status, Quotes द्वारे, जाणून घ्या बसवेश्वरांचे विचार

लाइफफंडा
भरत जाधव
Updated May 03, 2022 | 10:02 IST

लिंगायत (Lingayat ) धर्माचे धर्मगुरु (Dharmaguru), विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर (Basweshwar ​)  यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती (Basweshwar Jayanti) म्हणून साजरा केला जातो. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्यामुळे त्याचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात.

Happy Basaveshwar Jayanti through Facebook Messages, WhatsApp Status
Basweshwar Jayanti 2022: बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा द्या   |  फोटो सौजन्य: फेसबुक

Basweshwar Jayanti 2022 : लिंगायत (Lingayat ) धर्माचे धर्मगुरु (Dharmaguru), विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर (Basweshwar ​)  यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती (Basweshwar Jayanti) म्हणून साजरा केला जातो. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्यामुळे त्याचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात. यावर्षी बसवेश्वर जयंती 3 मे रोजी म्हणजेच आज आहे.  आज या बसवेश्वर जयंतीचं औचित्य साधून बसवण्णांच्या अनुयायींना बसवा जयंतीच्या शुभेच्छा देत आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला मदत करा. आजच्या या मंगलमयी दिवशी आपण त्यांची विचार ही जाणून घेऊ. 

कर्मकांडाला विरोध 

बसवेश्र्वरांनी स्वतःचा उपनयन-संस्कार करून घ्यायचे नाकारले, यावरून बालपणापासूनच त्यांचा भावहीन कर्मकांडाला विरोध असल्याचे दिसून येते. भव्य मंदिरे बांधण्यावर खर्च करू नये, तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही यांसारख्या मतांवरूनही त्यांनी कृत्रिम कर्मकांडाला विरोध केल्याचे स्पष्ट होते. लिंगायत लोक बसवेश्र्वरांना शिववाहन नंदीचा अवतार मानतात. 

WhatsApp

(फोटो- फेसबूक)

सर्व समान

पारंपारिक भारतीय समाजातील वर्णजातिमूलक उच्च-नीच्चता आणि विषमता यांची प्रखर जाणीव बसवेश्र्वरांना झाली होती. म्हणूनच त्यांनी चातुर्वर्ण्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. परिणामतः त्यांच्याभोवती सर्व वर्णातील आणि जातींतील अनुयायी जमा झाले. आंतरजातीय रोटी-बेटी व्यवहार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. 

बसवेश्वर

(फोटो- फेसबूक)

विश्वगुरू बसवेश्वरांची तत्त्वे

बसवेश्वरांनी दोन महत्त्वाच्या सामाजिक आणि आर्थिक तत्त्वांची माहिती दिली.

बसवेश्वर

कायाका (ईश्वरीय कार्य)

कायक तत्त्वानुसार समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार काम केले पाहिजे आणि ते काम आपल्या परीने आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवडीनुसार काम केले पाहिजे आणि ते काम पूर्ण करण्यात कोणत्याही प्रकारची कुचराई करू नये. बसवेश्वराजींनी अखंडतेवर भर दिला आहे.

बसवेश्वर

दसोहा (समान वितरण)

दसोहाच्या तत्त्वानुसार प्रत्येक समान कामासाठी समान उत्पन्नाला महत्त्व देण्यात आले. माणूस आपल्या कष्टातून जे काही कमावतो, ते आपल्या वर्तमान जीवनात खर्च करू शकतो, असे ते म्हणाले.  परंतु त्याने आपल्या भविष्यासाठी कोणत्याही प्रकारची संपत्ती किंवा संपत्ती जपून ठेवू नये, उलट समाजात राहणाऱ्या इतर गरीबांना काही वाटा द्यावा. अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्नातील काही भाग गरजू लोकांना दिल्यास समाजातील अनेकांच्या अडचणी दूर होऊ शकतात.

बसवेश्वर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी