Happy Dhulivandan 2023 Wishes in Marathi : धुलिवंदनाच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि WhatsApp मेसेज

Happy Dhulivandan 2023 Wishes in Marathi : धूलिवंदन हे एक भारतीय लोकोत्सव आहे. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड साजरी केली जाते.

happy dhulivandan 2023 Dhulwad wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi
धुलिवंदनाच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि WhatsApp मेसेज 
थोडं पण कामाचं
  • धूलिवंदन हे एक भारतीय लोकोत्सव आहे.
  • या दिवशी रंगाची उधळण होते.
  • या निमित्ताने Facebook आणि WhatsApp वर आपल्या जवळच्या लोकांना शुभेच्छा द्या

Happy Dhulivandan 2023 Wishes in Marathi: धुलीवंदनाच्या शुभेच्छा, Wishes, Facebook आणि WhatsApp मेसेज: धूलिवंदन हे एक भारतीय लोकोत्सव आहे. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड साजरी केली जाते. या उत्सवाचा संबंध कामदहनाशी जोडला जातो. पुराणांत याविषयी निरनिराळ्या कथा प्रचलित आहेत.या दिवसापासून नवे वर्ष सुरू होते असे उत्तर भारतात (पूर्णिमान्त मास) मानले जाते. तसेच समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे. (happy dhulivandan 2023 Dhulwad wishes images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi)

उत्तर भारतात या दिवशी सर्व स्तरांतील लोक एकमेकांवर रंग उडवतात. महाराष्ट्रात या दिवशी चिखल फेकण्याची चाल होती. होळीचे पवित्र भस्म अंगाला लावणे, यातून ही चाल आली असावी असा समज आहे. शिमगा वा होळी पोर्णिमा या सणातच धुळवडीचा अंतर्भाव होतो. होळी पोर्णिमेपासून  रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा केला जातो. होळीचे भस्म लावणे व आंब्याचा मोहोर खाणे, हे या उत्सवातील धार्मिक विधी आहेत.

थंड रंग स्पर्श,
मनी नव हर्ष…
अखंड रंग बंध
जगी सर्व धुंद..
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून  सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग 
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !

सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
धूलिवंदन निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
होळीच्या अणि धुलीवंदनच्या
हार्दिक शुभेच्छा…!!!

अधिक वाचा : Holi Shubh Muhurat Timing 2022: होळी या सणाचे महत्त्व, होलिका दहनाची तारीख आणि वेळ
 

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
धूलिवंदनाच्या शुभेच्छा  !
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी