Happy Friendship Day 2020: या सोप्या टिप्स वापरून घरीच बनवा फ्रेंडशिप बँड

लाइफफंडा
Updated Jul 31, 2020 | 19:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

friendship band at home: फ्रेंडशिप डेच्या दिवशी फ्रेंडस एकमेकांना बँड बांधतात.हा धागा मैत्रीचे प्रतीक मानला जातो.

friendship band
या सोप्या टिप्स वापरून घरीच बनवा फ्रेंडशिप बँड  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • या दिवशी फ्रेंडस एकमेकांना ग्रीटिंग कार्ड, फूल तसेच चॉकलेट गिफ्ट म्हणून देतात
  • यादिवशी फ्रेंडस एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँडही बांधतात.
  • यंदा फ्रेंडशिप डेवर कोरोनाचे संकट आहे.

मुंबई: फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री साजरा करण्याचा दिवस. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा सण साजरा केला जातो. हा दिवस सगळेजण आपल्य मित्रमैत्रिणींसोबत साजरा करतात. या दिवशी सगळे फ्रेंडस मिळून पार्टी करतात तसेच फिरायला जातात. ज्याप्रमाणे वडिलांसाठी फादर्स डे आणि आईसाठी मदरर्स डे समर्पित केलेला आहे त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणींसाठी फ्रेंडशिप डे आहे. या दिवशी फ्रेंडस एकमेकांना ग्रीटिंग कार्ड, फूल तसेच चॉकलेट गिफ्ट म्हणून देतात. बॉलिवूडमध्येही अशी अनेक गाणी आहेत जी मैत्रीवर आधारत आहेत. यावर्षी फ्रेंडशिप डे २ ऑगस्टला साजरा केला जात आहे. हा दिवस अनेक देशांमध्ये साजरा केला होता. 

यंदा फ्रेंडशिप डेवर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे घराबाहेर पडताही येणार नाही. यादिवशी फ्रेंडस एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँडही बांधतात. ज्यामुळे त्यांच्यातील मैत्री घट्ट राहील. सध्या कोरोनामुळे अनेक मार्केट्स बंद आहेत. त्यामुळे तुम्हाला फ्रेंडशिप बँड विकतही घेता येणार नाहीत. अशातच तुम्ही घरातही फ्रेंडशिप बँड बनवू शकता. 

पाहा कसा बनवायचा फ्रेंडशिप बँड

  1. एक आईस्क्रीम स्टिक घ्या. आईस्क्रीमची काडी पाण्यात ९ तास भिजवा. 
  2. नऊ तासानंतर ही स्टिक कपामध्ये मोल्ड करून ठेवा. ज्यामुळे त्याला बांगडीचा गोल आकार येईल. 
  3. जर ही स्टिक वाकत नसेल तर पाण्यात आणखी काही वेळ भिजत ठेवा. 
  4. कपमध्ये मोल्ड करण्यासाठी ८ ते ९ तास लागतील.त्यानंतर स्टिक मोल्डमधून काढून चांगली सुकवा.
  5. सुकवलेल्या स्टिकवर तुम्ही कलरने आपल्याला हवी ती डिझाईन अथवा आपल्या मित्राचे नाव काढू शकता. 
  6. तसेच स्टिकवर रंग देत असाल तर पहिला रंग सुकल्याशिवाय दुसऱ्या रंगाचा लेयर देऊ नका. 


मोत्यांचा फ्रेंडशिप बँड

हा फ्रेंडशिप बँड बनवण्यासाठी तुम्हाला मोती तसेच धाग्याची गरज लागेल. वेगवेगळ्या आकाराचे मोती घ्या. एक लांब धागा सुईमध्ये टाका. धागा छोटा घेऊ नका तो लांबच ठेवा. आता मोती या धाग्यामध्ये ओवत जा. जर तुमच्याकडे वेगवेगळ्या आकाराचे मोती असतील तर आधी मोठा मोती नंतर लहान मोती असे ओवत जा. तुम्हाला हव्या त्या आकाराचे फ्रेंडशिप बँड बनवा. उरलेला दोरा कापून घ्या. दोन्ही बाजूला गाठ बांधा ज्यामुळे मोती बाहेर येणार नाहीत. 
अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आपल्या फ्रेंडससाठी मस्त आणि स्वस्त फ्रेंडशिप बँड बनवू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी