Happy Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes: गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा देणारे मराठी Messages

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मराठी Messages तयार केलेले आहेत जे तुम्ही फक्त डाउनलोड करुन तुमच्या Whatsapp Status, Facebook वरुन शेअर करु शकतात.

happy ganesh chaturthi 2021 marathi wishes messages greetings to share via whatsapp status and facebook with friends and family
गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा देणारे मराठी Messages  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला महाराष्टासहित देशविदेशात आपल्या आवडत्या गणू बाप्पाचे आगमन होणार आहे.
  • हिंदु धर्माचा हा सर्वात मोठा सण मानला जातो, बुद्धीची देवता, 64 कलांचा अधिपती आणि गणांचा ईश गणपती या दिवशी आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येतो
  • एक, दीड, तीन, पाच, सात, दहा, अकरा, एकवीस अशा ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे वास्तव्य करुन मग आपल्या आवडत्या भक्तांचा निरोप  घेतो,  अशा साध्या आणि सुंदर स्वरुपाचा हा सण आहे.

Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes: भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला महाराष्टासहित देशविदेशात आपल्या आवडत्या गणू बाप्पाचे आगमन होणार आहे. हिंदु धर्माचा हा सर्वात मोठा सण मानला जातो, बुद्धीची देवता, 64 कलांचा अधिपती आणि गणांचा ईश गणपती या दिवशी आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येतो आणि मग पुढे एक, दीड, तीन, पाच, सात, दहा, अकरा, एकवीस अशा ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे वास्तव्य करुन मग आपल्या आवडत्या भक्तांचा निरोप  घेतो,  अशा साध्या आणि सुंदर स्वरुपाचा हा सण आहे.

गेल्या वर्षी प्रमाणे यंदा कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक स्तरावर हा सण फार धामधुमीत साजरा होणार नाही मात्र यामुळे निराश होण्याची गरज नाही. घरगुती  तुम्ही जोरदार सेलिब्रेशन करु शकता. अलिकडे सणा निमित्त ऑनलाईन शुभेच्छा देणं आलंच त्यामुळे कोरोनाचं (Coronavirus) संकट आणि गणेशोत्सव असं औचित्य लक्षात घेऊन गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मराठी Messages तयार केलेले आहेत जे तुम्ही फक्त डाउनलोड करुन तुमच्या Whatsapp Status, Facebook वरुन शेअर करु शकता.

गणेश चतुर्थी मराठी शुभेच्छा

Happy Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes

                                      Happy Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes (Photo Credits: BCCL)

गणेश चतुर्थी मराठी शुभेच्छा
अवघी सृष्टी करत आहे नमन

होत आहे बाप्पाचं आगमन

गणपती बाप्पा मोरया

गणेश चतुर्थी च्या मनापासुन शुभेच्छा!

Happy Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes 1

                                      Happy Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes (Photo Credits: BCCL)

गौरीपुत्रा तू गणपती, ऐकावी भक्तांची विनंती

मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया

गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes 2

                                      Happy Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes (Photo Credits: BCCL)

प्रिय बाप्पा..

तुझा मंडप असा शांत बघवत नाही रे

कोरोनाचं विघ्न लवकर संपव,

आम्ही तुला शरण येतो आमचं रक्षण कर

Happy Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes 3

                                      Happy Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes (Photo Credits: BCCL)

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभा

निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes 4

                                      Happy Ganesh Chaturthi 2021 Marathi Wishes (Photo Credits: BCCL)

कोरोनाच्या संकट काळात बाप्पा आपले रक्षण करो

अशा मनापासून सदिच्छा

श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्व गणेशभक्तांना

खूप खूप शुभेच्छा


दरम्यान, प्लेगच्या साथीमुळे शंभर वर्षांपूर्वी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. यानंतर आता कोरोनाचे संकट लक्षात घेउन बाप्पाचे आगमन गाजावाजात होणार नाहीये, मात्र नाराज होऊ नका घरच्या घरी बाप्पाची मनोभावे पूजा करुन हा सोहळा साजरा करा. सुरक्षित राहा. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी