Gudi Padwa 2021 Messages: गुढी पाडव्याच्या शुभेच्छा मराठमोळ्या Wishes, Greetings

महाराष्ट्रात नववर्षाची सुरूवात चैत्र पाडवा (Chaitra Padwa)  म्हणजेच गुढी पाडवा (Gudi Padwa) या सणापासून होते.

happy gudi padwa 2021 messages wishes images greetings stickers
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा मराठमोळ्या शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात नववर्षाची सुरूवात चैत्र पाडवा (Chaitra Padwa)  म्हणजेच गुढी पाडवा (Gudi Padwa) या सणापासून होते.
  • चैत्र शुक्ल प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस यंदा 13 एप्रिल या दिवशी आहे.
  • या दिवशी मोठ्या गुढ्या उभारून नागरिक नववर्षाचा पहिला दिवस साजरा करतात.

Happy Gudi Padwa 2021 Marathi Messages : महाराष्ट्रात नववर्षाची सुरूवात चैत्र पाडवा (Chaitra Padwa)  म्हणजेच गुढी पाडवा (Gudi Padwa) या सणापासून होते. चैत्र शुक्ल प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस यंदा 13 एप्रिल या दिवशी आहे. या दिवशी मोठ्या गुढ्या उभारून नागरिक नववर्षाचा पहिला दिवस साजरा करतात. चैत्र महिन्यातच वसंत ऋतूची सुरूवात होते. त्यामुळे निसर्गात झाडांना पालवी फुटते. निसर्गातील नवचैतन्याचा हा सण आपल्या आयुष्यातही नवी सुरूवात घेऊन येवो याची कामना करत नववर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना, मित्र मंडळींना मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook) या सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खास मराठमोळी ग्रीटिंग्स (Greetings), शुभेच्छापत्र, मेसेजेस, HD Images, Wallpapers, Wishes  च्या माध्यमातून शेअर करून या नववर्षाच्या शुभेच्छा देत मराठमोळ्या नववर्षाचा आनंद द्विगुणित करू शकतात.  यंदा गुढी पाडव्याचा सण हा कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे जंगी स्वरुपात साजरा केला जाऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या मनात असूनही आज नातेवाईकांना भेटणं टाळा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या एका क्लिकवर जगाच्या कानाकोपर्‍यात विखुरलेल्या तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मराठी शुभेच्छा द्यायला नका विसरू. 

गुढीपाडवा

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा..!

साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा..! मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण...! स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.!

गुढीपाडवा

चैत्राची सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण अन सुखाची बरसात नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास 4 दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात...

तुम्हाला व तुमच्या सहपरिवारास गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक

शुभेच्छा

गुढीपाडवा

जल्लोष नववर्षाचा... मराठी अस्मितेचा... हिंदू संस्कृतीचा...

सण उत्साहाचा...

मराठी मनाचा...

तुम्हाला गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो... गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा

गुढी पाडवा

माणस भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो

चला....

या वर्षाचा हा अखेरचा आठवडा माझ्याकडून काही चूक झाली आसल्यास क्षमस्व आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल

खुप सारे...

धन्यवाद

नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरुन

शुभेच्छा

गुढीपाडवा

ॐ गुढीपाडवा ॐ

स्वागत हिंदू वर्षाचे ...

अभिमान परंपरेचा...

सन्मान गुढीचा...

आपणा सर्वांना मराठी नव वर्षाच्या

शुभेच्छा

ॐ गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या शुभेच्छा.

गुढीपाडवा

ॐ गुढी-पाडवा ॐ

तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू द्या... नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या.....!!

गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या शुभेच्छा.

गुढीपाडवा

गुढीपाडवा

गुढीपाडवा

गुढीपाडवा

गुढीपाडवा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी