Happy Gudi Padwa 2023 Messages in marathi, मुंबई : हिंदू कालगणनेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करतात. यंदा 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त एवढे या सणाचे महत्त्व आहे.
शुभ कार्याचा आरंभ करण्याचा उत्तम दिवस म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडव्या निमित्त दरवर्षी शोभायात्रा काढल्या जातात. गुढीपाडव्याच्या निमित्ताने नातलगांना भेटून शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा केला जातो. ही बाब लक्षात घेऊन 'टाइम्स नाऊ मराठी'च्या वाचकांसाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छांचे संदेश. हे संदेश आपण फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यातून शेअर करू शकता अथवा स्टेटस म्हणून ठेवू शकता.( happy gudi padwa wishes 2023 : sms, messgages, greetings, images, whatsapp stickers)
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!