Hanuman Jayanti Wishes In Marathi: भारतामध्ये चैत्र महिन्यात राम नवमीच्या उत्सवानंतर मोठ्या जोशात साजरा केला जाणारा अजून एक दिवस म्हणजे हनुमान जयंती (Hanuman Jayanti). हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्मोत्सव (Hanuman Janmotsav). चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला अशी अख्यायिका आहे. त्यामुळे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते. यंदा हा मंगलमय दिवस १६ एप्रिल दिवशी आहे. भारतात मागील सलग दुसर्या वर्षी हनुमान जयंतीवर कोरोनाचं सावट होते. दोन वर्ष हा सण सर्वांनी घरातच राहून साजरा केला होता. पण यंदा नियम शिथील झाले आहे. त्यामुळे आपल्याला लाडक्या हनुमान बाप्पाचे दर्शन घेण्याची संधी बलोपासक सोडणार नाही. पण ज्यांना शक्य नाही अशांनी या दिवसाच्या निमित्ताने तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजणांच्या आयुष्यात खूप आनंद, समाधान, सौख्य यावं म्हणून प्रार्थना करताना ही मराठमोळी शुभेच्छापत्र (Greetings) व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), मेसेजेस (Messages),Wishes, GIFs यांच्यामाध्यमातून शेअर करायला विसरू नका.
हनुमान हा बलाढ्य आणि धाडसी होता. प्रभु रामचंद्रांचा निस्सीम भक्त होता. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांसाठी त्याने स्वामिनिष्ठेतून, राजनिष्ठेतून केलेल्या अतुलनीय कामाचे अनेक दाखले आहेत. आजही प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये माता सीता, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणासोबत हनुमानाची देखील मूर्ती हमखास पहायला मिळते. पिता केसरी आणि माता अंजनी यांच्या पोटी वायुदेवाची तपश्चर्या करून मारूतीचा जन्म झाल्याने पवनपुत्र असे देखील संबोधले जाते. आज त्यांच्या जन्मोत्सवामित्त हा मंग़लमय दिवस अजून करायला विसरू नका
राम लक्ष्मण जानकी
जय बोला हनुमान की!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांना श्रीरामांचे वरदान आहे
गधा ज्यांची शान आहे
बजरंगबली ज्यांचे नाव आहे
अशा संकटमोचन हनुमान ला माझा प्रणाम आहे
रामाप्रती भक्ती तुझीराम राखे अंतरी
रामासाठी शक्ती तुझीराम राम बोले वैखरी
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल पवनपुत्र हनुमान
यांस कोटी कोटी प्रणाम
जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥
राम दूत अतुलित बल धामा ।
अंजनी-पुत्र पवनसुत नामा ॥
हिंदू पुराणकथांनुसार, हनुमानाची उपासना मनातील भीतीला दूर करते, यामुळे माणसाची संकटांना सामोरे जाण्याची शक्यता वाढते. महाराष्ट्रात हनुमानाची भक्ती ही शरीर बलवान रहावे आणि निरोगी रहावे म्हणून देखील केली जाते. पूर्वीच्या काळात अनेक व्यायामशाळांच्या आसपास हनुमानाचं मंदिर अवश्य असायचं. समर्थ रामदास, स्वामी रामदास देखील हनुमानाचे उपासक होते ते तरूणांना मार्गदर्शन करताना हनुमानाचा आदर्श समोर ठेवण्यासाठी सांगत असे.