Happy Independence Day Images 2022: स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी Download करा हे Independence Day स्पेशल फोटो

Happy Independence Day Flag Images 2022 Download for Whatsapp DP: यंदा सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे.

Happy Independence Day Flag Images 2022 Download Here for Whatsapp and Facbook DP
Download करा हे Independence Day स्पेशल फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Download करा हे Independence Day स्पेशल फोटो
  • स्वातंत्र्यदिन साजरा करा
  • डिजिटल पद्धतीने साजरा करा स्वातंत्र्यदिन

Happy Independence Day Flag Images 2022 Download for Whatsapp DP: यंदा सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. देशभर स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी अर्थात फेसबुक, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, ट्विटर, इन्स्टाग्राम यांचा डीपी बदलून तिथे तिरंगा ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांना १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात 'हर घर तिरंगा' अंतर्गत आपापल्या घरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. । तिरंगा

मोदी सरकारची देशवासियांना मोठी भेट, ५ ते १५ ऑगस्टपर्यंत सर्व ऐतिहासिक स्मारकांच्या ठिकाणी विनामूल्य प्रवेश

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव डिजिटल पद्धतीने साजरा करण्यासाठी सोशल मीडिया अकाउंटचा डीपी अर्थात फेसबुक, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, ट्विटर, इन्स्टाग्राम यांचा डीपी बदलून तिथे तिरंगा ठेवणे सहज सोपे आणि शक्य आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑगस्ट २०२२ रोजी ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, भारत अमृत महोत्सव साजरा करत आहे. देश #HarGharTiranga साठी सज्ज आहे. मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी बदलत आहे. आपण पण सोशल मीडिया अकाउंटचा डीपी बदलू स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव डिजिटल पद्धतीने साजरा करू शकता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटचा डीपी बदलला आहे. पीएम मोदी यांच्या या कृतीचे अनुकरण करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मंत्री, नेते यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचे डीपी बदलले. 

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने तिरंगा उत्सवाचे आयोजन केले होते. यात भारताचा राष्ट्रध्वज डिझाइन करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट लाँच करण्यात आले. पिंगली व्यंकय्या यांनी देशाचा इतिहास आणि देशाचा आत्मा या दोन्हीचे प्रतिक असा राष्ट्रध्वज डिझाइन केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी