Happy Indian Constitution Day 2022 : संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Messages, Images, Quotes आणि शुभेच्छापत्रं!

Happy Indian Constitution Day  भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या संविधान दिवसा निमित्त शुभेच्छा तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टग्राम, ट्विटर वरुन शेअर करु शकता. त्यासाठी खास शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images आणि शुभेच्छापत्रं.

Happy Indian Constitution Day 2022 in marathi Quotes, Messages, Wishes, Whatsapp and Facebook Pictures To Share
संविधान दिनानिमित्त शुभेच्छा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारतामध्ये 26 नोव्हेंबर रोजी 'संविधान दिवस' साजरा केला जातो.
  • भारतीय नागरिकांसाठी लागू असणारे सर्व अधिकार व नियम या संविधानात नमूद केले आहेत.
  • 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा 2015 पासून सुरु झाली.

Happy Constitution Day 2022 Wishes: भारतामध्ये 26 नोव्हेंबर रोजी 'संविधान दिवस' साजरा केला जातो. भारतीय नागरिकांसाठी लागू असणारे सर्व अधिकार व नियम या संविधानात नमूद केले आहेत. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा 2015 पासून सुरु झाली. हा दिवस 'नॅशनल लॉ डे' म्हणूनही ओळखला जातो. भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या या दिवसाच्या शुभेच्छा तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), इंस्टग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) वरुन शेअर करु शकता. त्यासाठी खास शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images आणि शुभेच्छापत्रं.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधा स्वीकारले आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणाशिवाय संविधान दिनाचे सेलिब्रेशन अपूर्ण आहे. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मुंबई येथील इंदू मिल्स कमाऊंड्समधील आंबेडकर स्मारकाचा शिलान्यास करताना नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवसाची घोषणा केली होती.

संविधान दिनानिमित्त भारतात सार्वजनिक सुट्टी नसते.  संविधानाविषयी अधिक ज्ञान मिळवून लोकांना त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याविषयी अधिक जागृत करणे म्हणजे संविधान दिवसाचे खरेखुरे सेलिब्रेशन आहे. या नव्या युगामध्ये संविधानाविषयीच्या खास गोष्टी सोशल मीडियावर शेअर करुन या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यात येते.

संविधान दिवसाच्या शुभेच्छा

Constitution Day 2022 Wishes


संविधान दिवसाच्या शुभेच्छा!
समस्त भारतीय बांधवांना

Constitution Day 2022 Wishes 1
संविधान कितीही वाईट असू दे

ते चांगले सिद्ध होऊ शकते

जर त्याचे पालन करणारे

लोक चांगले असतील

संविधान दिनाच्या शुभेच्छा!

Constitution Day 2022 Wishes 2

संविधान दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

Constitution Day 2022 Wishes 3

संविधान दिवस 2022 च्या शुभेच्छा

खूप भाषा, शेकडो विधी

आणि हजार विधानं आहेत

या सर्वांना जोडून ठेवणारं

आपलं संविधान आहे

संविधान दिवसाच्या शुभेच्छा!

Constitution Day 2022 Wishes 4
 

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


शाळा आणि  महाविद्यालयांमध्ये संविधान दिवस साजरा करण्यासाठी संविधानाशी निगडीत वेगवेगळ्या प्रश्नमंजूषा, स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. संविधान हे प्रत्येक देशाच्या बांधणीचा पाया असून देशातील नागरिकांना दिलेले अधिकार आणि त्यांची कर्तव्यं यात नमूद केलेली असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी