Happy Kartik Purnima 2022 : कार्तिक पौर्णिमेनिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मराठीतून द्या शुभेच्छा

Happy Kartik Purnima 2022 : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा म्हणतात. आज 8 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा साजरी होत आहे. कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळीही म्हणतात. शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला होता. तसेच या दिवशी भगवान शिवाने त्रिपूरासूर राक्षसाचा वध केला होता. म्हणून या आनंदाप्रित्यर्थ दिवाळी साजरी केली होती.

Happy Kartik Purnima 2022 marathi wishes
कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा!  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा म्हणतात.
  • आज 8 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा साजरी होत आहे.
  • कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळीही म्हणतात.

Happy Kartik Purnima 2022 : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा म्हणतात. आज 8 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा साजरी होत आहे. कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळीही म्हणतात. शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला होता. तसेच या दिवशी भगवान शिवाने त्रिपूरासूर राक्षसाचा वध केला होता. म्हणून या आनंदाप्रित्यर्थ दिवाळी साजरी केली होती. या दिवशी मनापासून पूजा केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते होती श्रद्धा आहे. या निमित्ताने आपल्या मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना आणि आप्तेष्ठांना मराठीतून शुभेच्छा पाठवा. (Happy Kartik Purnima 2022 share marathi wishes to friends and family on social media)

सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली
शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी देव दीपावली
कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला, देव दिवाळीचा सण आला
एकच मागणे या कार्तिक पौर्णिमेला, सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना
कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

नव्या सणाला उजळू दे आकाश
सर्वत्र पसरू दे लख्ख प्रकाश, जुळावे नवे प्रेमबंध हा एकच ध्यास
आला आज कार्तिक पौर्णिमेचा सण खास
कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 

शंकरपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा देव दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

तिमिरातून तेजाकडे नेणारा हा सण
दाखवतो प्रकाशाची वाट, उगवते कर्तृत्वाची पहाट
नवी उमेद काजळी पुसण्याची, नात्यांचे रेशीम बंध घट्ट करण्याची
प्रकाशाचा हा उत्सव, आपले आयुष्य उजळून टाको
कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी