Maharashtra Day 2021 Images: महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी HD Wallpapers Wishes, Messages

महाराष्ट्र दिन Maharashtra Day Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपला संदेश मित्रापर्यंत पोहचवू शकतात

happy maharashtra day 2021 wishes greetings images messages
Maharashtra Day 2021 Images: महाराष्ट्र दिन मराठी शुभेच्छा  

थोडं पण कामाचं

  • संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना अभिमान वाटावा आणि उत्साहाने साजरा करावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Day).
  • 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र (Maharashtra) हे स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं.
  • 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र (Maharashtra) हे स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. या संयुक्त महाराष्ट्राची  राजधानी मुंबई  झाली. पण ती मिळवणे सोपे नव्हते. 

Maharashtra Day 2021: संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना अभिमान वाटावा आणि उत्साहाने साजरा करावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Day). 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र (Maharashtra) हे स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. या संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई  झाली. पण ती मिळवणे सोपे नव्हते. यंदा १ मे चा महाराष्ट्र दिन हा शनिवारी येत आहे. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवारहलाल नेहरु आणि सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भारताची भाषावर प्रांतरचना झाली. यात महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वास आले. मुंबई महाराष्ट्राची की गुजरातची यावरून प्रचंड संघर्ष झाला. दिल्लीतील नेत्यांचा डाव हाणून पाडत मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. या कार्यात  सुमारे 105 मराठी बांधव हुतात्मे झाले. अशा या खास दिवशी हुतात्मांना अभिवादन करून या संयुक्त महाराष्ट्राच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त   Maharashtra Day Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपला संदेश समोरच्यापर्यंत पोहोचवू शकता. Happy Maharashtra Day 2020 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठमोळे Messages, Greetings, Quotes, Hike Stickers च्या माध्यमातून शेअर करा. 

यंदा मोठ्या उत्साहात सार्वजनिक पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करता येणार नाही.  गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने यंदा घरात राहून महाराष्ट्र दिन साजरा तुम्ही करू शकतात. 

Maharashtra day HD Images

Maharashtra day । BCCL 

Maharashtra day HD Images

Maharashtra day 

Maharashtra day HD Images

Maharashtra day । Photo Facebook 

Maharashtra day HD Images

Maharashtra day । Photo Facebook 

महाराष्ट्र कामगार दिन महाराष्ट्र आणि भारतासह जगभरातील मराठी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी सरकारी आणि खासगी कंपन्या, उद्योगांना सुट्टी असते. योगायोग असा की याच दिवशी जागतिक कामगार दिनसुद्धा असतो. तसेच युरोपमध्ये मपेल नावाचा काठी उत्सवही साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी महाराष्ट्र निर्मितीत विरमरण आलेल्या 105 हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी