National Siblings Day Wishes: भाऊ-बहिणीचं (Brothers and Sisters) नातं हे निस्सिम असतं. त्यात कोणताही स्वार्थ नसते. हे नातं असं असतं, की त्यात एकमेकांशी सगळं काही शेअर केलं जात असतं. या नात्याचा गौरव म्हणून दरवर्षी 10 एप्रिल म्हणजेच आजचा दिवस देशभरात 'राष्ट्रीय भाऊ-बहिण दिन' म्हणजेच 'राष्ट्रीय भावंड दिन' (Siblings Day 2023) साजरा केला जातो. (Happy national siblings day 2023 sms whatsapp message quotes greetings wishes in marathi)
भावंड हे एकमेकांचे चांगले मित्र असतात. पण कधीकधी ते एकमेकांचे शत्रूही होतात. मात्र, जेव्हा काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा ते सगळं काही विसरून एकमेकांच्या मदतीला धावून येतात.
अमेरिका (USA) आणि कॅनडामध्ये (Canada) 10 एप्रिल रोजी 'नॅशनल सिब्लिंग डे' अर्थात 'राष्ट्रीय भावंड दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर यूरोपमध्ये (Europe)31 मे रोजी भावंड दिन (Brothers and Sisters Day) साजरा केला जातो. तुम्हाला माहित असेलच आपल्या देशात रक्षाबंधन (Raksha Bandhan) सणाला भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचा सण साजरा केला जातो. बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते. आयुष्यभर आपल्या संरक्षणासाठी भावाकडून वचन घेत असते. चला तर मग आजचा दिवस आपल्या भावंडांप्रति समर्पित करू या... त्यांना खास मराठी मेसेज, कोट्स, शायरी पाठवून त्यांचाविषयी प्रेम व्यक्त करूया....
राष्ट्रीय भाऊ-बहीण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
राष्ट्रीय भावंड दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Siblings Day 2023
Happy Siblings Day 2023