Happy New Year 2022 wishes in marathi : नवीन वर्षानिमित्त मराठीत शुभेच्छा

Whatsapp Quotes on Happy New Year 2022: सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या आगमनासाठी संपूर्ण जग सज्ज झालं आहे. याच निमित्ताने आपणही नव्या वर्षाच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

happy new year 2022 wishes message whatsapp and facebook status in marathi
नवीन वर्षानिमित्त मराठीत शुभेच्छा  
थोडं पण कामाचं
  • २०२१ वर्षाला निरोप देत आता २०२२ या नव्या वर्षासाठी सारं जग सज्ज झालं आहे.
  • कोरोनाच्या  संकटामुळे गेली दोन वर्ष  फारच वेगळ्या पद्धतीने सगळ्यांनाच जगावं लागलं.
  • आता २०२२ या नव्या वर्षात हे संकट दूर होऊन नव्या वर्षाच्या आगमनाची सर्वांनीच सुरुवात केली आहे

Happy New Year 2022 whatsApp Marathi wishes and Messages: २०२१ वर्षाला निरोप देत आता २०२२ या नव्या वर्षासाठी सारं जग सज्ज झालं आहे. (Happy New Year 2022) कोरोनाच्या  संकटामुळे गेली दोन वर्ष  फारच वेगळ्या पद्धतीने सगळ्यांनाच जगावं लागलं. त्यामुळे आता २०२२ या नव्या वर्षात हे संकट दूर होऊन नव्या वर्षाच्या आगमनाची सर्वांनीच सुरुवात केली आहे. तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि तिसऱ्या लाटेची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला नव्या वर्षाचे स्वागत करायचे आहे.  आता नव्या वर्षासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र असं असलं तरीही नव्या वर्षाचं स्वागत करताना आपल्याला काही नियम नक्कीच पाळावे लागणार आहेत. त्यामुळे यावेळी आपण एकत्र येणं शक्यतो टाळलं पाहिजे. पण असं असलं तरीही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण आपलं नववर्ष नक्कीच साजरं करु शकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो.  गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. 

दरवर्षी नववर्षानिमित्त सर्वत्र जल्लोष केला जातो. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे नववर्ष साजरा करताना अनेक बंधनं पाळावी लागणार आहेत. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे अनिवार्य आहे. तसंच वायू प्रदूषण होऊ नये यासाठी फटाके देखील फोडणे टाळावं. याशिवाय आता महाराष्ट्र सरकारने नाइट कर्फ्यू देखील लागू केला आहे. त्यामुळे या सगळ्यात गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला नववर्षाचं स्वागत करावं लागणार आहे.  

मात्र असं असलं तरीही कोरोनामुळे आपण आपल्या नववर्षाचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. कोरोना संसर्गामुळे आपण एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा नातेवाईकांना आणि मित्र-मंडळींना देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Happy New Year 2022 wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  


द्या नवीन वर्षाच्या (Happy New year 2022) खास शुभेच्छा!

new year 2022 wishes in marathi

                                                                       Happy New Year 2022 । Photo - BCCL 

आपल्या सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा 

new year 2022 wishes in marathi 1

                                                                       Happy New Year 2022 । Photo - BCCL 

पणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
Wish you very Happy new year!

नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा 

new year 2022 wishes in marathi 2

                                                                       Happy New Year 2022 । Photo - BCCL 

महाराष्ट्रातील सर्वांना नवीन वर्ष सुख-समाधानाचे आणि भरभराटीचे जावो!

नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा 

new year 2022 wishes in marathi 3

                                                                       Happy New Year 2022 । Photo - BCCL 

नव्या वर्षात तुम्हाला अमाप यश मिळो, तुमच्या सर्व इच्छा-अपेक्षा पूर्ण होवो!

नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा 

new year 2022 wishes in marathi 4

                                                                       Happy New Year 2022 । Photo - BCCL 

Wishing you all a very Happy New Year नववर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा! 

नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा

new year 2022 wishes in marathi 5

                                                                       Happy New Year 2022 । Photo - BCCL 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी