Happy Rakshabandhan 2020: रक्षाबंधनासाठी हे आहेत गिफ्ट ऑप्शन

लाइफफंडा
Updated Jul 31, 2020 | 16:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Happy Rakshabandhan 2020: रक्षाबंधनाला जर तुम्हाला तुमच्या बहिणीला काहीतरी वेगळे गिफ्ट द्यायचे असेल तर हे आहेत ऑप्शन. 

rakshabandhan
रक्षाबंधनासाठी हे आहेत गिफ्ट ऑप्शन 

थोडं पण कामाचं

  • या दिवशी भाऊ बहिणीला प्रेमाने गिफ्टही देतो.
  • तुम्ही तुमच्या बहिणीला हेअर अॅक्सेसरीज गिफ्ट करू शकता
  • बहिणीला तुम्ही एखादे पर्सनलाईज्ड गिफ्टही देऊ शकता

मुंबई: रक्षाबंधनाचा(rakshabandhan) सण देशभरातत साजरा केला जातो. श्रावणात हा सण येतो. बहिण-भावांचे नाते अधिक दृढ करणारा असा हा सण. यंदा हा सण देशभरात ३ ऑगस्टला साजरा केला जात आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. सर्व संकटापासून त्याचे रक्षण व्हावे असा यामागचा हेतू असतो आणि भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या दिवशी भाऊ बहिणीला प्रेमाने गिफ्टही(gift) देतो. जर तुम्हालाही तुमच्या बहिणीला काहीतरी वेगळे गिफ्ट द्यायचे आहे तर तुमच्यासाठी आम्ही काही ऑप्शन सांगत आहोत. हे गिफ्ट पाहून तुमची बहीण नक्कीच खुश होईल. 

गिफ्ट देण्यासाठी हे आहेत ऑप्शन

मग - कॉफी मग ही दररोज वापरली जाणारी वस्तू आहे. त्यामुळे तुम्ही कोणालाही हे गिफ्ट करू शकता. तसेच या कॉफीमगवर तुम्हाला काही वेगळा मेसेज लिहायचा असेल तर तोही तुम्ही लिहू शकता. 

घड्याळ - जर तुमच्या बहिणीला घड्याळ वापरायला आवडत असेल तर हा पण गिफ्टसाठी एक चांगला ऑप्शन आहे. मार्केटमध्ये विविध प्रकारचे फॅन्सी घड्याळ असतात. तसेच सुंदर स्टोनचे घड्याळही असतात जे तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट करू शकता. 

हेअर अॅक्सेसरीज - मुली त्यांच्या केसांबाबत फारच जागरूक तसेच स्टायलिश असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला हेअर अॅक्सेसरीज जसे विविध हेअरबँड, रफल्स, क्लिप्स देऊ शकता. त्याचबरोबर तिला कर्ल अथवा स्ट्रेट हेअर आवडत असतील तर तुम्ही कर्लर अथवा स्ट्रेटनर गिफ्ट करू शकता. 

मेकअप - प्रत्येक मुलीला मेकअप करायला आवडतो. तुमच्या बहिणीलाही त्याची आवड असेल तर तुम्ही तिला आयशेड्, मॅट लिपस्टिक्स तसे मस्कारा हे कॉम्बिनेशन गिफ्ट करू शकता. 

ड्रेसेस - तुमची बहिण जर फॅशनबाबतीत अधिक सजग असेल तर तुम्ही तिला एखाद युनिक ड्रेस गिफ्ट करू शकता. तिला जर ट्रेडिशनल कपडे आवडत असतील तर कुर्ता आणि स्ट्रेट पँट गिफ्ट करू शकता. जर ती वेस्टर्न ड्रेस वापरत असेल तर तिला क्रॉप टॉप आणि स्कर्ट हा ऑप्शन बेस्ट आहे. 

पर्सनलाईज्ड गिफ्ट - बहिणीला तुम्ही एखादे पर्सनलाईज्ड गिफ्टही देऊ शकता. एखाद्या उशीवर, घड्याळावर तसेच डायरी, मग तुम्ही देऊ शकता.

ब्लूटूथ स्पीकर्स आणि फोन अॅक्सेसरीज - सध्याच्या डिजीटल वर्ल्डमध्ये तुम्ही तुमच्या बहिणीला एखादे गॅजेटही गिफ्ट करू शकता. तिला तुम्ही साऊंड स्पीकर, पर्सनलाईज्ड मोबाईल कव्हर अथवा हेडफोन गिफ्ट करू शकता. 

ज्वेलरी - भारतात सणाच्या निमित्ताने महिलांना दागिने घालण्याची संधी मिळते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला एखादा दागिना गिफ्ट करू शकता. तिच्यासाठी तुम्ही कानातले, अंगठी अथवा नेकलेस घेऊ शकता. सणांच्या दिवसांमध्ये अशा दागिन्यांवर सूट असते. 

पर्सनाईल्जड फेस मास्क - सध्या सगळीकडेच कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे फेस मास्क घालणे अत्यंत गरजेचे बनले आहे. अशात तुम्ही तुमच्या बहिणीला पर्सनाईल्जड फेस मास्क गिफ्ट करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी