Happy Ram Navami 2021 Messages: श्री राम नवमीच्या दिवशी खास मराठी sms, WhatsApp, Facebook मेसेज

Happy Ram Navami 2021 Messages: श्री राम नवमीच्या दिवशी खास मराठी Wishes, Images, WhatsApp, Facebook Status शेअर करून द्या प्रभू राम जन्मदिनाच्या शुभेच्छा

happy ram navami 2021 message shri ram navami
श्री राम नवमीच्या दिवशी खास मराठी WhatsApp, Facebook मेसेज 

थोडं पण कामाचं

 • राम नवमी ही चैत्र महिन्यात नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते.
 • चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी श्रीरामचा वाढदिवस म्हणजेच रामनवमी म्हणून साजरी केली जाते.
 • 21 एप्रिल 2021 रोजी रामनवमी साजरी केली जाईल.

Happy Ram Navami Wishes in Marathi, मुंबई : राम नवमी ही चैत्र महिन्यात नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी श्रीरामचा वाढदिवस म्हणजेच रामनवमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्री रामाची पूजा अर्चना विधी विधानातून केली जाते. या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्म अयोध्येत राजा दशरथ यांच्या घरात झाला. 21 एप्रिल 2021 रोजी रामनवमी साजरी केली जाईल.

पौराणिक मान्यतानुसार भगवान श्रीराम यांनी पृथ्वीवरील अत्याचार संपवण्यासाठी अवतार घेतला. भगवान श्री राम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही ओळखले जाते. भगवान श्रीराम यांना विष्णूचा अवतार म्हणतात. अयोध्याच्या महाराजा दशरथांच्या घरी माता कौशल्यांनी त्रेतायुगात भगवान श्रीरामाला जन्म दिला. 

 तर अशा या राम नवमीच्या दिवशी खास मराठी Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Messages, Wishes शेअर करून द्या प्रभू श्री राम जन्मदिनाच्या शुभेच्छा.


राम नवमीला पाठवा संदेश (Ram Navami SMS In Marathi)

 1. श्री राम आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता आणो ही प्रार्थना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
 2. जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात, मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे…रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!
 3. छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 4. मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जीवनातून आपल्याला विचार, शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळो. श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 
 5. अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता गंधर्वाचे सूर लागले जय गीतं गाता आकाशाशी जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे.. राम नवमीच्या शुभेच्छा!
 6. प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी  श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना 
  ram navami 2021 messages wishes images greetings stickers to share with your loved ones and family to celebrate lord ram birthday
 7. प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी भरलेले होते. पण ते कायम त्यांना हसतमुखाने सामारे गेले.. त्यांचा हा आदर्श नक्की घ्या. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 8. प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येवो हीच इश्वरचरणी प्रार्थना.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 
 9. राम नवमीच्या दिवशी झाला रामाचा, ज्याने रावणाचा अहंकार मिटवून संहार केला पापाचा.. आणि पताका फटकावला पुण्याचा.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 10. राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे.. राम सुरुवात आहे आणि राम शेवट आहे. राम नवमीच्या शुभेच्छा!
 11. बोलो सियावर रामचंद्र की जय..श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 12. धर्माच्या मार्गावर चालाल तर तुम्हाला सुख, समृद्धि आणि संपत्तिची प्राप्ती होईल.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 13. गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी 14 वर्षांचा वनवास  झेलला आणि पापाचा संहार केला.. बोला श्री राम जय राम
 14. रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळे… राम नवमीच्या शुभेच्छा!
 15. राम नावाने करा जीवनाची सुरुवात , म्हणजे चांगल्या आयुष्याची सुरुवात, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 16. राम नवमीच्या शुभ दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभ शुभेच्छा!
 17. ज्या पावन भूमीत रामाने जन्म घेतला अशा या पावन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा! 
 18. ज्यांचे नाव लिहिण्यामुळे पाण्यात दगडही तरंगतात अशा प्रभू रामचंद्राचा महिमा सांगावा तितका कमीच आहे. जय श्री राम
 19. राम नामाचा जप करुन तर पाहा तुम्हाला किती समाधान मिळते ते प्रभू रामचंद्राच्या जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 20. या पावनभूमीत रामाचा जन्म झाला म्हणून आजही चांगल्या गोष्टी जगात टिकून आहेत. नाही का? 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी