Happy Rang Panchami messages in Marathi : महाराष्ट्रात सर्वच सण-उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करण्यात येतात. त्यात होळी आणि रंगपंचमीचा उत्साह वेगळाच असतो. रंगपंचमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन, धूळवड साजरी होते. तर ग्रामीण भागात पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येते. (Happy Rang Panchami 2023 messages to wish your family friends images quotes photos greeting message whatsapp and facebook status in marathi)
मात्र, कामानिमित्त तुम्हाला रंगपंचमी साजरी करणं शक्य होत नसेल तर काळजी करु नका. कारण, सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही रंगांची उधळण न करता म्हणजेच एकमेकांना शुभेच्छा पाठवून रंगपंचमी साजरी करु शकता. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेस काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव आला...
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग नाविन्याचा, रंग चैतन्याचा
रंग यशाचा, रंग समृद्धीचा
होळीच्या रंगात रंगून
जावो तुमचे जीवन आनंदून
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
रंग न जाणती जात नी भाषा
उधळण करुया चढू दे प्रेमाची नशा...
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजूनी फुलवुया प्रेम रंगांचे मळे...
रंगपंचमीच्या शुभेच्छा
रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात...
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वत:चा विसरुनी...
एकीचे महत्व सांगतात
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
पिचकारीतील पाणी, अन् रंगांची गाणी...
रंगपंचमीच्या सणाची, अनोखी कहाणी...
रंगांनी रंगलेल्या रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !